मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Radhika Merchant: फ्लोरल प्रिंट साडीत अशी तयार झाली राधिका मर्चंट, पाहा रॉयल लुक

Radhika Merchant: फ्लोरल प्रिंट साडीत अशी तयार झाली राधिका मर्चंट, पाहा रॉयल लुक

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 28, 2024 07:44 PM IST

Radhika Merchant Royal Look: अंबानी कुटुंबातील अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनपूर्वी राधिका मर्चंटचे सुंदर फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. यामध्ये ती फ्लोरल प्रिंट सिल्कची साडी नेसून तयार झालेली दिसते.

राधिका मर्चंटचा फ्लोरल प्रिंट साडी लुक
राधिका मर्चंटचा फ्लोरल प्रिंट साडी लुक

Radhika Merchant Floral Print Saree Look: अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका मर्चंट तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच प्रशंसा मिळवते. कार्यक्रम असो किंवा पार्टी प्रत्येक वेळी ती तिच्या ग्रेसफुल लूकने लोकांची मने जिंकते. नुकताच मित्राच्या लग्नात सहभागी झालेल्या राधिका मर्चंटचा देसी लूक पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. यामध्ये ती फ्लोरल प्रिंटची साडी नेसून तयार आहे. राधिकाचे सुंदर लूकचे फोटो पाहून कोणतीही मुलगी साडी नेसण्याची प्रेरणा घेऊ शकते. पाहा तिचा हा रॉयल लूक.

फ्लोरल प्रिंट सिल्क साडी

मुलींना बऱ्याचदा हेवी साडी नेसण्याची भीती वाटते. अशा परिस्थितीत राधिका मर्चंटचा हा रॉयल लूक नक्कीच प्रेरणा देऊ शकतो. ज्यामध्ये ती तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी फ्लोरल प्रिंट सिल्क साडीत तयार आहे. सब्यसाचीच्या कलेक्शनमधून घेतलेल्या साडीवर हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे फुलांचे मोटिफ्स आहेत. मिंट ग्रीन कलरचा हेवी एम्ब्रॉयडरी ब्लाउज साडीसोबत अतिशय स्मार्ट पद्धतीने पेअर केला आहे. जो खूपच सुंदर दिसत आहे.

साध्या साडीसोबत कॅरी करा हेवी ब्लाउज

जर तुम्हाला राधिका मर्चंटच्या लूकमधून टिप्स घ्यायच्या असतील तर कोणत्याही साध्या फ्लोरल प्रिंटच्या साडीसोबत मॅचिंग कलरचा हेवी एम्ब्रॉयडरी ब्लाउज कॅरी करा. यामुळे तुमचा लुक पार्टी रेडी आणि वेगळा बनवण्यात मदत होईल.

राधिका मर्चंटने साडीसोबत घातला गजरा

स्लीव्हलेस हेवी एम्ब्रॉयडरी ब्लाउजसोबतच तिने नेकपीस आणि साइड पार्टिशन हेअर बनसह केसांमध्ये गजरा लावला होता. जे पूर्णपणे पारंपारिक दिसत आहे.

साडीची ड्रेपिंग आहे खास

लुक आणखी स्टायलिश दिसण्यासाठी साडीचा पदर ओपन करण्यासोबतच काऊल स्टाईलमध्ये कॅरी केला आहे. यातून मुलींना नक्कीच प्रेरणा मिळू शकते. साडीचा हा लूक तुम्हाला तरुण दिसण्यास आणि गर्दीत वेगळे दिसण्यास मदत करेल. हा लुक तुम्ही लग्न समारंभप्रमाणेच एखाद्या पार्टीसाठी सुद्धा करू शकता.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel