रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जाऊन सहकुटुंब महाकुंभमेळ्याला भेट दिली. मुकेश अंबानी यांच्यासोबत त्यांची आई, कोकिळाबेन अंबानी, मुलगा आकाश आणि अनंत अंबानी, सून श्लोका मेहता आणि राधिका मर्चंट यांच्यासह नातवंडे पृथ्वी आणि वेदा यांचाही समावेश होता. माघ पौर्णिमेच्या पूर्वसंध्येवर अंबानी कुटुंबीयांनी गंगा, यमुना आणि सरस्वती नदीचे पवित्र संगम असलेल्या त्रिवेणी संगमावर स्नान केले.
या पवित्र धार्मिक यात्रेसाठी संपूर्ण अंबानी कुटुंबाने पारंपारिक पोशाख परिधान केला होता. मात्र सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा अनंत अंबानी आणि त्याची पत्नी राधिका मर्चंट हिच्या ट्रॅडिशनल लूकची होतेय.
उद्योगपती मुकेश अंबानी यांची धाकटी सून, अनंत अंबानी याची पत्नी राधिका अंबानी हिने या धार्मिक यात्रेसाठी सैल फिट असलेला व्ही-नेकलाइन आणि लांब बाह्या असलेला नेव्ही ब्लू रंगाचा सिल्क कुर्ता परिधान केला होता. कुर्त्याचा गळा आणि बॉर्डरवर सोनेरी जरीचे भरतकाम केले होते. राधिका मर्चंटने नेव्ही ब्लू सिल्क कुर्त्यासोबत मिंट ग्रीन रंगाची धोती पँट आणि मॅचिंग दुपट्टा परिधान केला होता. तर अनंत अंबानी याने लाल आणि मरून रंगाच्या कुर्त्यावर जॅकेट परिधान केले होते. त्याच्या कमरकोटवर नाजूक चांदीचे अलंकार आणि सोनेरी भरतकाम केले होते. अनंतने गळ्यात सोन्याची साखळी घातली होती. लक्झरी कुर्ता सेटसोबतच राधिकाने कानात आकर्षक हिऱ्याचे इयररिंग्स आणि गळ्यात चेन नेकलेस घातलेले दिसत होते. तिच्या चेहऱ्यावर फारसा मेकअप केलेला नव्हता. डोळे कोरडे होते. चांगल्या प्रकारे परिभाषित भुवया होत्या आणि तिच्या गालांवर ब्लशचा इशारा असलेला न्यूड लिप शेड होता. तिचा पारंपारिक आणि साधा लूक पूर्ण करत तिने लो पोनीटेलमध्ये केस बांधले.
राधिका अंबानीचा नेव्ही ब्लू कुर्ता आणि मिंट ग्रीन धोतीचे डिझाइन कोणत्या ड्रेस डिझायनरचे याचा शोध सोशल मीडियावर लावण्यात आला. मुंबईतील प्रसिद्ध ड्रेस डिझायनर जयंती रेड्डी हिच्या ब्रँडचे असून त्याची बाजारातील किंमत तब्बल १ लाख ९ हजार ९०० रुपये आहे.
उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती विरेन आणि शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा गेल्या वर्षी प्रचंड झगमगाटात मुंबईत विवाह संपन्न झाला होता. मुंबईत अंबानी यांचे आलिशान निवासस्थान असलेली अँटिलिया इमारत तसेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आठवडाभर हा विवाह सोहळा पार पडला होता. या लग्नसोहळ्यात जगभरातील सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले होते.
संबंधित बातम्या