Protein Rich Food: शरीराला प्रोटीन हवंय पण मांसाहार खात नाही? 'या' व्हेज पदार्थांमध्ये भरभरून आहे प्रोटीन
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Protein Rich Food: शरीराला प्रोटीन हवंय पण मांसाहार खात नाही? 'या' व्हेज पदार्थांमध्ये भरभरून आहे प्रोटीन

Protein Rich Food: शरीराला प्रोटीन हवंय पण मांसाहार खात नाही? 'या' व्हेज पदार्थांमध्ये भरभरून आहे प्रोटीन

Dec 27, 2024 11:55 AM IST

What foods to eat for protein In Marathi: जीवनसत्त्वांप्रमाणेच शरीरात प्रोटीन असणेही खूप महत्त्वाचे आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे, एखाद्या व्यक्तीला पाय सुजणे, थकवा आणि उर्जेची कमतरता जाणवू लागते.

Which vegetarian foods contain protein
Which vegetarian foods contain protein (freepik)

Protein-Rich Vegetarian Foods In Marathi:  आजकाल अयोग्य आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे शरीराला योग्य पोषक घटक मिळत नाहीत. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागतात. जीवनसत्त्वांप्रमाणेच शरीरात प्रोटीन असणेही खूप महत्त्वाचे आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे, एखाद्या व्यक्तीला पाय सुजणे, थकवा आणि उर्जेची कमतरता जाणवू लागते. अशा परिस्थितीत, सामान्यतः लोकांचा असा विश्वास आहे की मांसाहारामुळे जास्त प्रोटीन मिळते. पण हा समज बरोबर नाही. काही शाकाहारी पदार्थ आहेत ज्यात भरपूर प्रोटीन असते.

डाळी-

डाळ नक्कीच प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात मिळेल. यामध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असते. याच्या रोजच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. तूर, मूग, उडीद, मसूर, हरभरा आणि राजमा यासारख्या जवळजवळ सर्व प्रकारची कडधान्ये प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत.

सोयाबीन आणि टोफू-

जी व्यक्ती मांसाहारी नाही. त्याने सोयाबीन आणि टोफूचे सेवन करावे. त्यामध्ये प्रोटिन्स पुरेशा प्रमाणात असतात. हे पदार्थ तुम्ही भाजी आणि कोशिंबीर म्हणून खाऊ शकता. याचे नियमित सेवन केल्यास शरीरात प्रोटीनची कमतरता भासणार नाही.

ड्रायफ्रुट्स आणि बिया-

जर तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर ड्रायफ्रुट्स आणि बियांचे सेवन सुरू करा. बदाम, चिया सीड्स, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया यांसारखे ड्रायफ्रूट्स आणि बियाचे रोज सेवन करावे. त्याच वेळी, या ड्रायफ्रुट्समध्ये फायबर आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड देखील भरपूर असतात. जे इतर रोग बरे करण्यासाठी प्रभावी आहेत.

दुग्धजन्य पदार्थ-

शरीरातील प्रोटीनची कमतरता टाळण्यासाठी दूध, दही, ताक आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे. प्रोटीनशिवाय यामध्ये कॅल्शियम देखील पुरेशा प्रमाणात असते. ज्यामुळे शरीराची हाडे मजबूत होतात.

Whats_app_banner