Protein Powder Recipe: वेटलॉस आणि मसल गेनसाठी हजारो खर्च करून प्रोटीन पावडर घेताय, आता घरीच बनवा हेल्दी प्रोटीन पावडर-protein powder recipe spending thousands for weight loss and muscle gain now make healthy protein powder at home ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Protein Powder Recipe: वेटलॉस आणि मसल गेनसाठी हजारो खर्च करून प्रोटीन पावडर घेताय, आता घरीच बनवा हेल्दी प्रोटीन पावडर

Protein Powder Recipe: वेटलॉस आणि मसल गेनसाठी हजारो खर्च करून प्रोटीन पावडर घेताय, आता घरीच बनवा हेल्दी प्रोटीन पावडर

Sep 26, 2024 04:03 PM IST

How to make protein powder: प्रोटीन पावडर शरीरातील दुबळे स्नायू वाढवण्यास आणि पचनक्रिया संतुलित ठेवण्यासदेखील मदत करते.

Weight loss protein powder
Weight loss protein powder (Freepik)

Weight loss protein powder:  शरीरातील पोषणाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रोटीन पावडर हा एक उत्तम पर्याय आहे. अनेकदा वर्कआउट सेशननंतर प्रोटीन पावडर दुधात मिसळून प्यायल्याने शरीरात ऊर्जा वाढते. प्रोटीन पावडर शरीरातील दुबळे स्नायू वाढवण्यास आणि पचनक्रिया संतुलित ठेवण्यासदेखील मदत करते. परंतु बाजारात मिळणाऱ्या प्रोटीन पावडरमध्ये अनेक प्रकारच्या कृत्रिम चवींचा वापर केला जातो. त्यामुळे शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही. अशा परिस्थितीत घरी तयार केलेली प्रोटीन पावडर शरीराला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

प्रोटीनची गणना मुख्य तीन मॅक्रोन्यूट्रिएंट्समध्ये केली जाते. ज्यात कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स यांचा समावेश होतो. जे शरीराच्या कार्यामध्ये मदत करतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, प्रोटीनच्या सेवनाने शरीराला अमीनो ऍसिड मिळतात. यामुळे पचनक्रियेची गती वाढते आणि भूक नियंत्रित राहते. त्यामुळे शरीरातील स्नायू आणि ताकद दोन्ही वाढू लागतात. शिवाय वजन कमी होण्यास मदत होते. चला तर मग पाहूया घरातच ही हेल्दी प्रोटीन पावडर कशी बनवायची.

प्रोटीन पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

-भाजलेले हरभरे २ वाट्या

-ओट्स १ कप

-फ्लेक्स सीड २ चमचे

-भोपळ्याच्या बिया २ टेस्पून

-चिया सीड १ टीस्पून

-बदाम १/२ कप

-कोको पावडर 1 टीस्पून

प्रोटीन पावडर बनवण्याची रेसिपी-

-सर्व प्रथम, भाजलेले हरभरे घ्या, ते सोलून घ्या आणि पावडरच्या स्वरूपात वाटून घ्या. हरभरे सालासह बारीक केल्यानंतर, पावडर गाळूनदेखील घेता येते.

-आता एका कढईत पीठ सोनेरी होईपर्यंत कोरडे भाजून घ्या. हाताने चोळून बारीक पावडर तयार करा.

-आता एका पॅनमध्ये फ्लेक्स सीड्स, चिया सीड आणि भोपळ्याच्या बिया टाका आणि भाजून घ्या. त्यात हवे असल्यास बदाम पण टाका.

-सर्वकाही एकत्र बारीक करून एका भांड्यात ठेवा.

-यानंतर, सर्वकाही एका मोठ्या भांड्यात घेऊन मिक्स करावे. आता त्यात कोको पावडर घाला. आपण इच्छित असल्यास, त्याऐवजी दालचिनी पावडरदेखील घालू शकता.

-तयार पावडर तुमच्या सोयीनुसार पाण्यात किंवा दुधात मिसळून प्या. चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात १ चमचे मधही घालू शकता.

Whats_app_banner