Moong Dal Idli Recipe: निरोगी राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्यात प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला पोटभर आणि पौष्टिकतेने परिपूर्ण नाश्ता बनवायचा असेल तर मूग डाळीपासून बनवलेला नाश्ता तुमच्यासाठी परफेक्ट आहे. पण प्रत्येक वेळी तेच पदार्थ बनवण्याऐवजी मूग डाळ इडली ट्राय करा. हे बनवायला सोपे आहे आणि पटकन तयार होईल. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायची मूग डाळ इडली.
- १ वाटी पिवळी मूग डाळ (साल नसलेली)
- २ हिरव्या मिरच्या
- १ इंच आल्याचा तुकडा
- अर्धी वाटी वाटाणे
- कोथिंबीरचे देठ बारीक चिरलेले
- २-३ चमचे हिरवा कांदा बारीक चिरलेला
- २ चिमूटभर हिंग
- लाल तिखट
- १/४ चमचा हळद
- १ चमचा इनो
- चवीनुसार मीठ
- तूप
प्रोटीनयुक्त मूग डाळ इडली बनवण्यासाठी प्रथम मूग डाळ धुवून सात ते आठ तास भिजत ठेवा. ते चांगले भिजल्यावर पाणी गाळून त्यात हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे टाकून बारीक पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, उकडलेले हिरवे वाटाणे, २ चिमूटभर हिंग घालून मिक्स करा. आता यात हिरवा कांदा, हळद, तिखट आणि मीठ टाकून एकत्र मिक्स करा. शेवटी एक चमचा इनो पावडर घालून मिक्स करा. स्टीमरमध्ये वाफ काढा आणि इडली साच्यात तयार केलेले बॅटर टाकून शिजवा. शिजल्यावर वर थोडं देशी तूप टाका आणि साधारण एक मिनिट वाफेवर ठेवा. तुमटे टेस्टी मूग डाळ इडली तयार आहे. गरमा गरम इडली सांबार, चटणीसोबत सर्व्ह करा.