मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Propose Day Wishes: प्रपोज डेला या सुंदर मॅसेजने व्यक्त करा आपले प्रेम, होईल इंप्रेस

Propose Day Wishes: प्रपोज डेला या सुंदर मॅसेजने व्यक्त करा आपले प्रेम, होईल इंप्रेस

Feb 07, 2024 11:58 PM IST

Propose Day 2024 Message: प्रपोज डे ८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला इंप्रेस करण्यासाठी हे रोमँटिक मॅसेज पाठवू शकता. येथे पहा प्रपोज डे साठी बेस्ट मॅसेज

हॅपी प्रपोज डे मॅसेज
हॅपी प्रपोज डे मॅसेज (freepik)

Happy Propose Day 2024 Wishes: व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. ज्या प्रेमविरांच्या मनात दडलेल्या भावना व्यक्त करता येत नाहीत त्यांच्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. अशा प्रेमींसाठी ८ फेब्रुवारी म्हणजेच प्रपोज डे हा त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. प्रपोज करण्याचे अनेक मार्ग आहेत. हे आवश्यक नाही की तुम्ही तुमच्या भावना थेट तुमच्या लवरकडे व्यक्त करा. तुम्ही तुमच्या भावना शब्दातही व्यक्त करू शकता. तुम्हालाही तुमच्या खास व्यक्तीला प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल तर प्रपोज डेचे हे मेसेज, कोट्स आणि व्हॉट्सॲप मेसेज तुम्हाला मदत करू शकतात. पाहा हे बेस्ट प्रपोड डेचे मॅसेज.

नाही आजपर्यंत बोलता आले,

ट्रेंडिंग न्यूज

आज ते सारे तुला सांगणार आहे...

नाही मी जगू शकत तुझ्याशिवाय,

इतकंच तुला सांगणार आहे...

Happy Propose Day!

 

स्पर्श तुझा व्हावा

अन् देह माझा चुरावा

हक्काने मिठीत तू घ्यावेस

जसा पाण्यावरी स्पर्श चांगण्यांचा असावा

Happy Propose Day!

 

तू हो म्हणालीस तर होईल

प्रत्येक क्षण खास

आयुष्यभर मिळेल का

मला तुझा सहवास?

Happy Propose Day!

श्वास असेपर्यंत तुला साथ देईन,

दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन,

माहीत नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल,

आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन...

Happy Propose Day!

 

ओढ लागलीया तुला मिळवायची,

तू मला समजून घेशील का?

लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं

प्रेम तुझं देशील का?

थांबव आता खेळ हा स्वप्नांचा

कायमची माझी होशील का?

Happy Propose Day!

प्रेमाचा खरा अर्थ

तू मला समजून सांगितलास

माझ्या आयुष्याचा खरा अर्थ

तू मला उमगवून सांगितलास

Happy Propose Day!

 

समुद्राला किनाऱ्याची साथ

चंद्राला चांदण्यांची साथ

तू फक्त दे माझ्या हातात हात

मी देईन तुला जीवनभर साथ

Happy Propose Day!

चंद्रास साथ जशी चांदण्यांची

तशी साथ तू मला देशील का?

जीवनाच्या या सुंदर प्रवासात

तुझा हात हाती देशील का?

Happy Propose Day!

WhatsApp channel