मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Propose Day 2024: प्रेम व्यक्त करताना लक्षात ठेवा या गोष्टी, नाते बिघडवू शकतात या चुका

Propose Day 2024: प्रेम व्यक्त करताना लक्षात ठेवा या गोष्टी, नाते बिघडवू शकतात या चुका

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 08, 2024 11:52 AM IST

Tips to Propose: मनातील भावना व्यक्त करणे हे प्रत्येकासाठी सोपे काम नसते. तुम्हाला तुमच्या क्रशला आय लव्ह यू म्हणण्याची योग्य पद्धत माहित असली पाहिजे. प्रपोज करताना काही चुका करणे टाळले पाहिजे. प्रपोज करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.

प्रपोज करण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या गोष्टी
प्रपोज करण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या गोष्टी (unsplash)

Things to Keep in Mind When Proposing: व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस प्रपोज डे (propose day) प्रत्येक प्रियकराला प्रेमाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा आत्मविश्वास देतो. रोझ डे सेलिब्रेट केल्यानंतर प्रपोज डेच्या दिवशी प्रेम करणारे एकमेकांना आपल्या फीलिंग्स शेअर करून आपल्या मनातील भावना भावना व्यक्त करतात. खरं तर मनातील भावना व्यक्त करणे प्रत्येकासाठी सोपे काम नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या क्रशला आय लव्ह यू म्हणण्याची योग्य पद्धत माहित असली पाहिजे. जर तुम्हाला प्रेम व्यक्त करण्याचा योग्य मार्ग माहित नसेल तर तुम्हाला निराश व्हावे लागू शकते. प्रपोज करताना तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घ्या.

आवडी लक्षात ठेवा

तुमच्या ड्रीम गर्लला प्रपोज करण्यापूर्वी तिच्या आवडी-निवडी नीट जाणून घ्या. जेणेकरून तिच्याकडे तुमचे प्रेम व्यक्त करताना तुमच्या तोंडून तिला न आवडणारे असे काही निघणार नाही आणि त्याने तुमची बनत असलेली गोष्ट फिसकटणार नाही.

रिलेशनशिप स्टेटस जाणून घ्या

कोणाकडेही तुमचे प्रेम व्यक्त करण्यापूर्वी ती व्यक्ती आधीपासून कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये आहे की नाही हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. तुम्ही त्यांच्या मैत्रीला प्रेम समजत असाल. हा गैरसमज दूर करण्यासाठी मुलीला प्रपोज करण्यापूर्वी तीला इतर कोणी आवडते का ते शोधा.

दिखाऊपणापासून दूर राहा

दिखाऊपणासाठी नव्हे तर जोडीदाराच्या हृदयात स्थान मिळवण्याच्या उद्देशाने प्रपोज करा. यासाठी मुलीला प्रपोज करताना खोटेपणा आणि दिखावा करण्यापासून दूर राहा. असे केल्याने जेव्हा तुमचे वास्तव तिच्यासमोर येते, तेव्हा तुमचे बनलेली गोष्ट बिघडू शकते.

योग्य शब्द वापरा

अनेक वेळा समोरच्या व्यक्तीसाठी तुमच्या भावना चांगल्या असूनही तो तुमचा प्रेम प्रस्ताव नाकारतो. हे मुख्यतः तेव्हा घडते जेव्हा तुम्ही तिला प्रपोज करताना चांगले आणि योग्य शब्द निवडण्यात अपयशी ठरता. जर तुम्हाला काही शब्दांत प्रपोज करायचे असेल तर योग्य शब्द संवेदनशीलपणे मांडा. प्रेम फक्त शब्दात व्यक्त करता येत नाही. तुमचं त्यांच्यावर अतोनात प्रेम आहे, हे तुमच्या वागण्या-बोलण्यातूनही समजावून सांगा.

 

स्पेशल असण्याचे रहस्य सांगा

तुमच्या पार्टनरला प्रपोज करताना ती तुमच्यासाठी किती स्पेशल आहे आणि ती इतरांपेक्षा वेगळी का आहे याची जाणीव करून द्या. हे करत असताना तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या कुटुंबाबद्दलही सांगू शकता. जेणेकरून तुम्ही त्यांच्याबद्दल खूप सिरीयस आहात हे त्याला किंवा तिला समजेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel