Tips to React when Partner Breaks Promise: लव्ह बर्ड्ससाठी व्हॅलेंटाईन वीक खूप खास असतो. विशेषत: जे आपल्या नात्याबद्दल गंभीर असतात ते प्रॉमिस डेच्या दिवशी एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारची वचने देतात. पण प्रॉमिस फक्त करायची नसतात, तर तरी पाळणे सुद्धा महत्त्वाचे असते. जर तुमचा जोडीदार त्याच्या वचनांवर टिकून राहिला नाही तर रागवण्याऐवजी या मार्गांनी प्रतिक्रिया द्या. जेणेकरून तुमच्या नात्यावर विपरीत परिणाम होणार नाही. पार्टनरने प्रॉमिड मोडले तर कसे रिअॅक्ट व्हावे, कसे वागावे हे जाणून घ्या.
जर तुमच्या पार्टनरने तुम्हाला दिलेले वचन मोडले असेल तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. त्यापेक्षा थोडा वेळ स्वतःला आणि पार्टनरला द्या. जेणेकरून दोघांनाही कळेल की दिलेले वचन पूर्ण झाले नाही. अनेक वेळा आश्वासने वास्तववादी नसतात. अशा परिस्थितीत त्यांची पूर्तता करणे कठीण असते. किंवा कधी कधी ते वचन तुमच्यासाठी इतके महत्त्वाचे नाही. त्यामुळे लगेच त्यावर प्रतिक्रिया देऊन पार्टनरसोबतचे नाते खराब करू नका.
हेल्दी आणि लाँग रिलेशनशिपसाठी संवादाची विशेष भूमिका असते. म्हणून जेव्हा जेव्हा वचन मोडले जाते तेव्हा आपल्या पार्टनरशी बोलणे महत्वाचे आहे. असे केल्याने तुम्हाला वचन मोडण्याचे खरे कारण कळेल आणि तुमच्या नात्यात कटुता येणार नाही.
तुमच्या पार्टनरने तुम्हाला दिलेले वचन मोडले असेल तर तुमच्या भावना तुमच्या पार्टनरला नक्की सांगा. त्यांना सांगा की तुम्हाला वचन मोडल्याबद्दल वाईट वाटत आहे आणि तुम्हाला काय पाहीजे. यामुळे नात्यातील कोणत्याही प्रकारचा दुरावा टाळता येईल.
जर तुमच्या पार्टनरने वचन मोडले असेल तर असे का घडले ते बोलून शोधा. त्यावर उपाय शोधण्याचाही प्रयत्न करा. कारण तुटलेल्या प्रॉमिसचा रिलेशनशिपवर नकारात्मक परिणाम होतो. बोलून उपाय शोधण्याचा प्रयत्न करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)