Promise Day to Strengthen Relationship: व्हॅलेंटाईन वीकमध्ये बरेच लोक त्यांच्या क्रशला आपल्या भावना व्यक्त करतात. जर तुम्ही सुद्धा तुमच्या भावना, प्रेम व्यक्त केले असेल आणि त्याला/तिला आयुष्यभर साथ द्यायची असेल, तर व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस नक्कीच साजरा करा. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे नंतर येणारा प्रॉमिस डे खूप स्पेशल आहे. या दिवशी तुमच्या जोडीदाराला तुमच्या प्रेमाबद्दल आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन द्या. तसेच तुमच्या पार्टनरला ही ५ वचने द्या आणि तुमच्या भावना व्यक्त करा. हे ऐकून तुमच्या पार्टनरला चांगले वाटेल आणि तुमचे नाते अधिक घट्ट होईल.
नात्यात प्रेमासोबतच आदरही खूप महत्त्वाचा असतो. प्रॉमिस डे वर तुमच्या जोडीदाराचा आदर करण्याचे वचन द्या. तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या वैयक्तिक बाबींचा आदर करण्याचे वचन तिला नक्कीच तुमच्या प्रेमात पाडेल.
जर तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य तुमच्या व्हॅलेंटाईनसोबत घालवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर त्याला/तिला आनंदी ठेवण्याचे वचन देणे महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक नात्यात आनंद महत्त्वाचा असतो. म्हणून तिला कधीही दुःखी न करण्याचे वचन द्या.
तुमच्या जोडीदाराला वचन द्या की तुम्ही त्याला कठीण काळात साथ द्याल. सुख असो वा दु:ख, तुम्ही त्याला सदैव साथ द्याल. अडचणीच्या वेळीच स्वतःची आणि इतरांची ओळख होते. त्यामुळे हे वचन प्रॉमिस डेला नक्की द्या.
तुम्हाला आयुष्यभराची साथ हवी असेल तर तुमच्या जोडीदाराची परिस्थिती समजून घेण्याचे वचन द्या. प्रत्येक वेळी परिस्थिती बदलते आणि त्यानुसार जीवनात पुढे जावे लागते. अशा परिस्थितीत जोडीदाराला साथ देण्यासाठी त्यावेळची परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.
प्रेमळ नात्यात प्रेम खूप महत्वाचे आहे. नात्यात तुमच्या जोडीदारावर नेहमी प्रेम करण्याचे वचन द्यायला विसरू नका.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)