Promise Day 2025 Wishes : सध्या सगळीकडेच व्हॅलेंटाईनचे वारे वाहत आहेत. अनेक लोक आपल्या जोडीदारासाठी हा दिवस आणि हा संपूर्ण आठवडा कसा खास बनवता येईल, यांचे प्रयत्न करत आहेत. व्हॅलेंटाईन डे हा एकच दिवस येत असला, तरी प्रेमी लोक या आधी येणारा संपूर्ण आठवडा वेगवेगळे दिवस साजरा करून आणखी रोमांचक बनवतात. या संपूर्ण आठवड्यातील प्रत्येक दिवसाला एक वेगळं महत्त्व आहे. आता या आठवड्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजेच 'प्रॉमिस डे'आहे. या दिवशी प्रत्येकाने आपल्या जोडीदाराला काही खास वचन देऊन आपलं प्रेम व्यक्त करू शकता. तुमच्यासाठी हे खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत, जे तुम्ही आपल्या जोडीदाराला पाठवू शकता.
प्रत्येक क्षणी तुझ्यावरच करेन प्रेम
हे माझे वचन आहे तुला,
वचन कायम निभावेन
हे देते वचन तुला!
हॅप्पी प्रॉमिस डे
चंद्राचा तो शीतल गारवा,
मनातील प्रेमाचा पारवा
या नशिल्या संध्याकाळी हात तुझा हाती हवा…
वचन दे तुला मला कधीही न ये हा दुरावा!
हॅप्पी प्रॉमिस डे
नाही आजपर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे,
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतके तुला सांगणार आहे!
हॅप्पी प्रॉमिस डे
तुला दिलेले प्रेमाचे वचन
हे कधीही न मोडण्यासाठीच आहे,
विश्वास ठेव माझ्यावर
तुझ्याशिवाय जगण्याला
माझ्या अजिबातच अर्थ नाहीये
विश्वास ठेव!
Happy Promise Day
मी आज तुझ्यासमोर माझ्या प्रेमाचे वचन घेत आहे,
माझा श्वास असेपर्यंत मी फक्त आणि फक्त तुझाच राहीन
तुझ्याशिवाय कोणाचाही विचार माझ्या मनात येणार नाही!
हॅप्पी प्रॉमिस डे
माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर मुलगी तूच आहेस,
आज मी तुला वचन देतो की, मी फक्त तुझ्याशी लग्न करेन,
आणि इतर कोणालाही माझ्या आयुष्यात तुझी जागा देणार नाही!
हॅप्पी प्रॉमिस डे
कदाचित मी तुला खूप
श्रीमंतीत ठेऊ शकणार नाही,
पण माझ्या प्रेमाने
मी तुला कायम सुखात ठेवेन
हे माझ्याकडून तुला वचन आहे!
Happy Promise Day
फुलाच्या पाकळीप्रमाणे जपेन
असं खोटं वचन मी तुला कधीही देणार नाही,
पण तुझ्या चेहऱ्यावरचे हसू कमी होऊ देणार नाही,
हे मात्र नक्कीच वचन देईन!
Happy Promise Day
संबंधित बातम्या