मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Travel Tips : नैसर्गिक सौंदर्यानं परिपूर्ण असलेलं हे भेट पंतप्रधानांनाही आवडतं, तुम्हीही करा ट्रिप प्लॅन

Travel Tips : नैसर्गिक सौंदर्यानं परिपूर्ण असलेलं हे भेट पंतप्रधानांनाही आवडतं, तुम्हीही करा ट्रिप प्लॅन

Jan 06, 2024 03:25 PM IST

PM Modi Visit at Lakshadweep Islands: नुकतेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील एका बेटाला भेट दिली. तुम्हीही त्या ठिकाणी भेट देऊन अविस्मरणीय अनुभव घेऊ शकता.

PM Modi's Visit Lakshadweep
PM Modi's Visit Lakshadweep (PTI )

Lakshadweep Trip: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एक बेटाला भेट दिली. त्यांनी त्या ट्रिपचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर टाकले. तेव्हापासूनच या टुरिस्ट डेस्टिनेशनबद्दल चर्चा होत आहे. हे ठिकाण आहे लक्षद्वीप. लक्षद्वीप हा भारतात गुगलवर सर्वाधिक शोधला जाणारा ९वा शब्द ठरला आहे. याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीप दौरा. पीएम मोदी लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यावर स्नॉर्कलिंग करताना आणि फिरताना दिसले. त्यांनी टाकलेले हे फोटो पाहिल्यानंतर कोणालाही या सुंदर बेटाला भेट द्यावी आणि तेथील सौंदर्याचा आनंद लुटावा असे वाटू शकते. तुम्हालाही तुमच्या पुढच्या प्रवासासाठी लक्षद्वीप हे ठिकाण निवडायचे असेल, तर तुम्ही या बेटावर कोणत्या ठिकाणी भेट देऊ शकता आणि कोणत्या ऍक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता ते जाणून घ्या.

आगती बेट

आगत्ती बेट हे सुंदर बेट त्याच्या टेस्टी फूड साठी प्रसिद्ध आहे. तिथे तुम्ही सी फूडपासून शाकाहारी जेवणापर्यंत अनेक खाद्य पर्याय मिळू शकतात. तुमची ट्रिप आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही स्नॉर्कलिंग करून पाण्याखालील दुनियाचा आनंद घेऊ शकता.

मिनिकॉय बेट

मिनिकॉय बेट हे लक्षद्वीपमधील सर्वात प्रमुख बेटापैकी एक आहे. या बेटावर तुम्ही समुद्रकिनाऱ्यांचा आणि बोटिंगचा आनंद घेऊ शकता. याशिवाय तुम्ही तिथे वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता, ज्यामुळे तुमची ट्रिप आणखीन छान होईल.

ट्रेंडिंग न्यूज

कावरत्ती बेट

जर तुम्हाला निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. या बेटाच्या समुद्रकिनाऱ्यावर पसरलेली पांढरीशुभ्र वाळू आणि सूर्यास्ताचे सुंदर दृश्य ही या ठिकाणची खासियत आहे.

काल्पेनी बेट

काल्पेनी बेट हे फारसे प्रसिद्ध पर्यटन स्थळ नाही. याच कारणांमुळे तुम्हाला शांततेत वेळ घालवायचा असेल तर हे बेट उत्तम आहे. येथे तुम्ही अनेक खास पदार्थांसह स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel