Press Freedom Day 2024: का साजरा केला जातो प्रेस फ्रीडम डे, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Press Freedom Day 2024: का साजरा केला जातो प्रेस फ्रीडम डे, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

Press Freedom Day 2024: का साजरा केला जातो प्रेस फ्रीडम डे, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

May 03, 2024 09:35 AM IST

Press Freedom Day 2024: दरवर्षी ३ मे रोजी प्रेस फ्रीडम डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या.

Press Freedom Day 2024: का साजरा केला जातो प्रेस फ्रीडम डे, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व
Press Freedom Day 2024: का साजरा केला जातो प्रेस फ्रीडम डे, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व (AFP Photo)

Press Freedom Day History and Significance: सत्य लोकांसमोर आणण्याची जबाबदारी माध्यमांची म्हणजेच प्रेसची आहे. तथापि त्यांना त्यांची कर्तव्ये पार पाडताना अनेकदा धमक्या, हिंसा आणि सेन्सॉरशिप सारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. सरकार आणि जनतेने प्रसारमाध्यमे आणि पत्रकारांना आपले कर्तव्य शक्य तितक्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी एक संवाहक वातावरण तयार करणे महत्वाचे आहे. पत्रकारांसमोरील आव्हाने आणि माहितीचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी त्यांनी बजावलेल्या कर्तव्यांची आठवण करून देण्यासाठी दरवर्षी ३ मे रोजी प्रेस फ्रीडम डे साजरा केला जातो. पत्रकार होणं हे सोपं काम नाही, याची ही प्रत्येकाला आठवण करून देणारं काम आहे. हा खास दिवस साजरा करताना या दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि यावर्षीची थीम जाणून घ्या.

प्रेस फ्रीडम डेचा इतिहास

१९९१ मध्ये युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेच्या शिफारशीनंतर १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने दरवर्षी ३ मे रोजी प्रेस फ्रीडम डे साजरा करण्याची स्थापना केली. १९९४ मध्ये पहिला प्रेस फ्रीडम डे साजरा करण्यात आला. पत्रकारांना स्वातंत्र्य मिळावे आणि कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पत्रकारांचे स्मरण व सन्मान व्हावा या हेतूने या दिवसाची स्थापना केली गेली.

प्रेस फ्रीडम डेचे महत्त्व

यंदाच्या प्रेस फ्रीडम डेची थीम आहे - अ प्रेस फॉर द प्लॅनेट : पर्यावरण संकटाचा सामना करताना पत्रकारिता. जनतेला नेहमीच सर्व प्रकारची माहिती मिळायला हवी आणि पत्रकारांना त्यांचे काम करण्यासाठी सुरक्षित जागा निर्माण करण्यासाठी सरकारने सहकार्य केले पाहिजे, याचा पुनरुच्चार करण्यासाठी हा दिवस मदत करतो. 

हा दिवस माध्यम संस्था आणि पत्रकारांना सत्य सांगण्यासाठी आणि प्रेस स्वातंत्र्याचा नेहमीच आदर राखण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मानित करतो.

 

Whats_app_banner