मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pregnancy Care: उन्हाळ्यात गर्भवती महिलांनी अशी घ्यावी स्वतःची काळजी, अवश्य खा या गोष्टी

Pregnancy Care: उन्हाळ्यात गर्भवती महिलांनी अशी घ्यावी स्वतःची काळजी, अवश्य खा या गोष्टी

Mar 31, 2024 11:00 PM IST

Summer Health Care Tips: गरोदरपणातील नऊ महिने महिलांसाठी खूप खास आणि नाजूक असतात. अशा परिस्थितीत त्यांना उन्हाळा कठीण होऊ शकतो, त्यामुळे गर्भवती महिलांनी या ५ गोष्टींचा आहारात समावेश करावा.

गर्भवती महिलांनी उन्हाळ्यात खाव्यात या गोष्टी
गर्भवती महिलांनी उन्हाळ्यात खाव्यात या गोष्टी (unsplash)

Summer Foods to Eat During Pregnancy: ऋतू कोणताही असो, गर्भवती महिलांनी साधारणपणे ते काय खातात याबद्दल अधिक सावध असले पाहिजे. वास्तविक गर्भधारणेचे नऊ महिने खूप खास असतात. अशा स्थितीत खाण्यापिण्याबाबत खूप काळजी घेतली पाहिजे. उन्हाळा सुरू झाला असून या काळात अडचणी वाढू शकतात. तुम्ही प्रेग्नेंट असाल तर उन्हाळ्यात आपल्या आहारात या गोष्टींचा समावेश करायला विसरु नका.

- जर तुम्हाला जास्त ग्लास पाणी पिण्यास त्रास होत असेल तर तुम्ही टरबूज खाऊ शकता. यामध्ये चांगल्या प्रमाणात पाणी असते. हे उन्हाळी फळ सगळ्यांच्याच आवडीचे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

- गरोदर महिलांनी उन्हाळ्यात बदाम, अक्रोड, चिया सीड्स आणि फ्लेक्ससीड्स यांसारखे नट्स आणि सीड्स खावे. त्यामध्ये हेल्दी फॅट, प्रथिने, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमसारखे आवश्यक पोषक असतात. निरोगी चरबी बाळाच्या मेंदूच्या विकासास मदत करू शकतात. नट्स आणि सीड्समधील व्हिटॅमिन ई बाळाच्या पेशींच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे. तसेच मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते.

- गरोदर महिलांनी दही जरूर खावे. हे तुम्हाला उन्हाळ्यात केवळ हायट्रेड ठेवणार नाही तर यातून प्रथिने आणि कॅल्शियमही मिळते.

- काकडी हा उन्हाळ्यातील सर्वोत्तम आहार मानला जातो आणि गर्भधारणेच्या आहारात त्याचा समावेश केला पाहिजे. त्याची स्मूदी तुम्ही सकाळी आणि दुपारी पिऊ शकता. हायड्रेशनसाठी हे सर्वोत्तम अन्न आहे.

- गर्भवती महिलांसाठी नारळाचे पाणी देखील चांगले मानले जाते. तुम्ही दिवसभरात एक किंवा दोन नारळ पाणी पिऊ शकता. त्यात भरपूर पोषक असतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel