what care should be taken to avoid miscarriage: गर्भधारणेदरम्यान विविध कारणांमुळे वाढणारी गुंतागुंत ही गर्भपाताचे कारण असल्याचे सिद्ध होते. गर्भपाताचा परिणाम स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दिसून येतो. स्पॉटिंग, क्रॅम्प्स आणि द्रव स्त्राव ही या समस्येची मुख्य लक्षणे आहेत. गर्भपाताची बहुतेक प्रकरणे पहिल्या तीन महिन्यात दिसतात. अशा परिस्थितीत महिलांनी गरोदरपणात खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते प्रवासापर्यंत सर्व गोष्टींबाबत सावध राहण्याची गरज आहे. आज आपण गर्भपाताची काही सामान्य कारणे जाणून घेणार आहोत.
अनेक प्रकरणांमध्ये गर्भपात रोखणे शक्य होत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, नियमित तपासणी आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घेणे फारच गरजेचे आहे. जेणेकरून गर्भपाताची समस्याच उद्भवणार नाही. ज्या महिलांना पहिल्या तिमाहीत गोळे येणे, खालच्या ओटीपोटात दुखणे आणि रक्तस्त्राव जाणवतो त्यांनी ताबडतोब वैद्यकीय तपासणी करावी.
शरीरातील हार्मोनल असंतुलन हे गर्भपाताचे कारण असल्याचे सिद्ध होते. वास्तविक, गर्भाशयाच्या अस्तराची पूर्ण वाढ होत नाही, त्यामुळे फलित एग्ज इन्फ्लान्ट करण्यात अडचणी येतात. अशा स्थितीत पिट्यूटरी ग्रंथीतून बाहेर पडणाऱ्या प्रोलॅक्टिन प्रजनन हार्मोन्सची पातळी गर्भाशयाच्या अस्तराच्या वाढीस प्रतिबंध करू शकते.
धुम्रपान, मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन यामुळे विषारी पदार्थ शरीराच्या संपर्कात येतात. त्यामुळे गर्भपात होण्याचा धोका कायम आहे. याशिवाय खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष केल्याने शरीरात पोषणाची कमतरता वाढते आणि शरीर डिहायड्रेशनलाही बळी पडतो. यामुळेसुद्धा गर्भपात होऊ शकतो.
गर्भधारणेदरम्यान, शरीरात सायटोमेगॅलॉइरस म्हणजेच सीएमव्ही, लिस्टेरिया, रुबेला आणि टॉक्सोप्लाज्मोसिस सारख्या संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे मुलांच्या वाढीवर परिणाम होऊ लागतो. त्यामुळे गर्भधारणेचा धोकाही होऊ शकतो. या संसर्गाच्या प्रसारामुळे गर्भपात होण्याची शक्यता अनेक टक्क्यांनी वाढू शकते. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांशी चर्चा करून हा संसर्ग होणार नाही यांची काळजी घ्यावी.
वयाच्या ३५ व्या वर्षांनंतर कुटुंब नियोजन करणाऱ्या महिलांमध्ये प्रजनन दर कमी होऊ लागतो. यामुळे, मुलामध्ये डाऊन सिंड्रोमचा धोका असतो. याशिवाय गर्भावस्थेतील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.
बहुतेक महिलांना गर्भधारणेदरम्यान कमी भूक लागते. अशा परिस्थितीत आहाराची काळजी न घेतल्याने अन्नातून विषबाधा होण्याची समस्या वाढू लागते. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे वारंवार उलट्या झाल्यासारखे वाटते, त्याचा परिणाम मुलांच्या वाढीवरही दिसून येतो. त्यामुळेच गर्भपात होण्याचा धोकाही वाढतो.