Pregnancy Tips: प्रेग्नेंन्सीच्या पहिल्या ३ महिन्यात अजिबात करू नका 'या' ५ चुका, आई आणि बाळासाठी ठरू शकतं घातक-pregnancy tips what should be avoided during the first three months of pregnancy ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pregnancy Tips: प्रेग्नेंन्सीच्या पहिल्या ३ महिन्यात अजिबात करू नका 'या' ५ चुका, आई आणि बाळासाठी ठरू शकतं घातक

Pregnancy Tips: प्रेग्नेंन्सीच्या पहिल्या ३ महिन्यात अजिबात करू नका 'या' ५ चुका, आई आणि बाळासाठी ठरू शकतं घातक

Sep 11, 2024 12:19 PM IST

what should be taken care of by pregnant women: गरोदरपणात महिलांना त्यांच्या होणाऱ्या बाळाबद्दल उत्सुकता असते. मात्र, या काळात महिलांना तणाव आणि आरोग्याच्या अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते.

प्रेग्नेंसीच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्यावी
प्रेग्नेंसीच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्यावी (pexel)

what should not be done during pregnancy:  गर्भधारणा हा एक अतिशय रोमांचक काळ आहे. जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नेंट असते तेव्हा तो तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. गरोदरपणात महिलांना त्यांच्या होणाऱ्या बाळाबद्दल उत्सुकता असते. मात्र, या काळात महिलांना तणाव आणि आरोग्याच्या अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते. विशेषतः, गर्भधारणेचे पहिले तीन महिने खूप नाजूक असतात. अशा परिस्थितीत महिलांनी गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत काही चुका करणे टाळावे. गरोदरपणात महिलांनी नेमक्या कोणत्या गोष्टी करू नये आपण जाणून घेऊया.

१) जास्त वजन उचलणे टाळा-

तुम्ही गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात जास्त वजन उचलणे टाळावे. जड वस्तू उचलल्याने गर्भपाताचा धोका वाढतो. जर तुम्ही देखील पहिल्या तिमाहीत असाल तर तुम्ही पुन्हा पुन्हा वाकून काहीही काम करू नका. शिवाय पाण्याची बादली, घागर इत्यादी जड वस्तू उचलणे टाळा.

२) जास्त व्यायाम करणे टाळा-

गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत जास्त व्यायाम करणे टाळावे. वास्तविक, पहिल्या तिमाहीत जास्त व्यायाम केल्याने गुंता वाढू शकतो. यामुळे गर्भपाताचा धोकाही वाढू शकतो. म्हणूनच, गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत फक्त हलका व्यायाम करा. अन्यथा, तुमच्या समस्या वाढू शकतात.

३) तणाव किंवा काळजी करणे टाळा-

गर्भधारणेदरम्यान तणाव किंवा काळजी करू नका. या काळात तणावामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. खरं तर, गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदल होतात. यामुळे तुम्हाला तणावाचा अनुभव येऊ शकतो. अशा स्थितीत तणाव घेणे टाळावे. तणाव आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यास हानी पोहोचवू शकतो.

४) पुरेशी झोप घ्या-

गरोदरपणात पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे. झोपेची कमतरता किंवा निद्रानाश तुमचे आरोग्य बिघडवू शकते. याशिवाय गर्भधारणेदरम्यान तुम्हाला थकवा जाणवू शकतो. त्यामुळे पुरेशी झोप घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.

५) मद्यपान आणि धूम्रपान करू नका- 

धावपळीच्या जगात टेन्शन आणि ताणतणावामुळे पुरुष आणि काही स्त्रियासुद्धा धूम्रपान, मद्यपान करतात. पण गर्भधारणेदरम्यान मद्यपान आणि धूम्रपान करणे खूप हानिकारक आहे. तुम्ही गरोदरपणात मद्यपान करत असाल किंवा धूम्रपान करत असाल, तर त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत, गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यात तुम्ही दारू किंवा धूम्रपान अजिबात करू नये. तसं सांगायचं झालं तर शक्यतो कधीच हे व्यसन करू नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner