Yoga Mantra: 'ही' ४ योगासनं कराल तर 'आई' होण्यास मिळेल मदत! वाढेल प्रजनन क्षमता, कशी करायची जाणून घ्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: 'ही' ४ योगासनं कराल तर 'आई' होण्यास मिळेल मदत! वाढेल प्रजनन क्षमता, कशी करायची जाणून घ्या

Yoga Mantra: 'ही' ४ योगासनं कराल तर 'आई' होण्यास मिळेल मदत! वाढेल प्रजनन क्षमता, कशी करायची जाणून घ्या

Oct 05, 2024 09:36 AM IST

Yogas to Conceive: वास्तविक, जास्त वेळ बसल्याने शरीराचे वजन वाढते, जे वंध्यत्वाचे मुख्य कारण बनते. चला जाणून घेऊया कोणत्या योगासनांच्या मदतीने वंध्यत्वाची समस्या दूर होऊ शकते.

Yogas to Conceive
Yogas to Conceive (freepik)

Remedies to Increase Fertility:  अलीकडच्या काळात वंध्यत्वाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. शरीरात पोषणाचा अभाव, हार्मोनल असंतुलन, मधुमेह आणि वाढता ताण यामुळे वंध्यत्व येऊ लागते. अशा परिस्थितीत औषधे, आहार आणि उपचारांची मदत घेण्यासोबतच शरीर सक्रिय ठेवणेही गरजेचे आहे. रोज सकाळी काही वेळ योगासनांचा सराव केल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते.ज्यामुळे शरीराचे कार्य व्यवस्थित राहण्यास मदत होते. वास्तविक, जास्त वेळ बसल्याने शरीराचे वजन वाढते, जे वंध्यत्वाचे मुख्य कारण बनते. चला जाणून घेऊया कोणत्या योगासनांच्या मदतीने वंध्यत्वाची समस्या दूर होऊ शकते. जेणेकरून तुमची प्रजनन क्षमता वाढून प्रेग्नन्सीमधील अडथळा दूर होईल.

स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या का वाढते?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरात दर सहापैकी एक व्यक्ती प्रजनन वयात वंध्यत्वाला बळी पडते. शरीरातील फॅलोपियन ट्यूब, गर्भाशय, फायब्रॉइड्स आणि एंडोक्राइन सिस्टीममधील समस्यांमुळे ही समस्या वाढते. याशिवाय खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आणि दारूचे सेवन यामुळे हा धोका वाढतो. त्यामुळेच अनेक स्त्रियांना गर्भधारणा होण्यास अडथळे निर्माण होत आहेत.

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी करा ही योगासने-

१) विपरितकरणी आसन (भिंतीवर पाय वर करणे)-

पाय वर करून केले जाणारे हे योग आसन शरीरात रक्ताभिसरण वाढवते. यामुळे डोकेदुखी, तणाव आणि निद्रानाश यापासून आराम मिळतो. याशिवाय, पेल्विक स्नायू बळकट होतात, ज्यामुळे शरीराच्या खालच्या स्नायू सक्रिय होतात आणि निरोगी प्रजनन आरोग्य राखण्यास मदत होते.

२) सुप्तबद्ध कोणासन-

सुप्तबद्ध कोनासनाचा सराव केल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो आणि शरीरात लवचिकता वाढते. यामुळे पचनक्रिया मजबूत होते आणि सूज कमी होते. यामुळे खालचे शरीर अर्थातच स्नायू मजबूत होतात. ज्यामुळे तुमची प्रजनन क्षमता सुधारते. आणि तुमच्या प्रेग्नन्सीमधील अडथळे दूर होतात.

३)उत्कट कोनासन (देवीची मुद्रा)

शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यासाठी आणि पेल्विक स्नायूंना बळकट करण्यासाठी या योगासनाचा सराव करा. यामुळे शरीराची स्थिती सुधारण्यास मदत होते आणि स्नायूंचा वाढता दबावदेखील कमी करता येईल. त्यामुळे तुमची प्रजनन क्षमता सुधारून गर्भधारणा होण्यास मदत होईल.

४) गुप्त पद्मासन योग-

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी गुप्त पद्मासन योगाचा सराव केल्याने प्रजनन क्षमता सुधारते. यामुळे प्रजनन अवयव मजबूत होतात. या काळात शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित राहते. जेणेकरून तुम्हाला गर्भधारणा होण्यास मदत होते.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

Whats_app_banner