मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pregnancy Weight Gain: गर्भधारणेदरम्यान किती वजन वाढणे योग्य असते? जाणून घ्या सविस्तर

Pregnancy Weight Gain: गर्भधारणेदरम्यान किती वजन वाढणे योग्य असते? जाणून घ्या सविस्तर

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 08, 2024 11:44 PM IST

Pregnancy Tips: प्रेग्नेंसीमध्ये महिलांचे वजन वाढणे हे सामान्य आहे. पण वजन वाढत असताना ते किती वाढले पाहिजे आणि जास्त वजनामुळे महिलांना तसेच बाळाला काय धोका आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

Pregnancy Weight Gain: गर्भधारणेदरम्यान किती वजन वाढणे योग्य असते? जाणून घ्या सविस्तर
Pregnancy Weight Gain: गर्भधारणेदरम्यान किती वजन वाढणे योग्य असते? जाणून घ्या सविस्तर

Pregnancy Weight Gain: गर्भधारणेदरम्यान वजन वाढणे अगदी सामान्य आहे. यावेळी शरीराला सर्व आवश्यक पोषण आवश्यक असते. त्याच वेळी बाळाचे वजन आणि प्लेसेंटा देखील शरीराशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत गर्भधारणेदरम्यान किती वजन वाढणे हेल्दी आहे आणि जेव्हा जास्त वजनामुळे महिला लठ्ठ होऊ लागतात तेव्हा हे जाणून घेणे आवश्यक आहे. गर्भधारणेदरम्यान वजन वाढणे हे निरोगी बाळावर तसेच स्त्रीच्या शरीराच्या बीएमआयवर अवलंबून असते. गर्भधारणेदरम्यान बॉडी मास इंडेक्सनुसार किती वजन वाढणे सामान्य आहे हे जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

गरोदरपणात वजन वाढवण्यासाठी गाइडलाइन

- मायोक्लिनिकच्या मते ज्या महिलांचे वजन कमी असते, म्हणजेच बीएमआय १८.५ च्या खाली राहते. गर्भधारणेदरम्यान त्यांचे वजन १३ ते १८ किलोने वाढणे आरोग्यदायी आहे. यामुळे बाळाची वाढ चांगली होते आणि बाळ निरोगी होते.

- जर वजन सामान्य असेल म्हणजे बीएमआय १८.५ ते २४.९ असेल तर महिलांनी त्यांचे वजन ११ ते १६ किलोने वाढवायला हरकत नाही.

- ज्या महिलांचे वजन जास्त आहे. म्हणजे बीएमआय २५ ते २९.९ आहे. त्यांचे वजन ७ किलो ते ११ किलोपर्यंत वाढवणे योग्य मानले जाते.

गर्भात जर जुळी बाळ असतील तर

पण जर गर्भात जुळी बाळ असतील तर वजन वाढण्याचा नियम वेगळा आहे. सामान्य वजन असलेल्या महिलांचे वजन यावेळी सुमारे १७ ते २५ किलो वाढू शकते. त्याच वेळी जास्त वजन असलेल्या महिलांचे वजन १४ ते २३ किलोने वाढले पाहिजे.

जास्त वजन वाढल्यामुळे होणारे धोके

गरोदरपणात जास्त वजन वाढल्याने बाळाच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. बाळाचे वजन सामान्यपेक्षा जास्त असू शकते. तसेच जन्माच्या वेळी समस्या असू शकतात. बाळाचे खांदे बर्थ कॅनलमध्ये अडकू शकतात. त्याच वेळी प्रेग्नेंसीमध्ये अतिरिक्त वजन प्रसूतीनंतर वजन कमी करणे कठीण करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग