Yoga Mantra: नॉर्मल डिलिव्हरीसाठी करा 'ही' योगासने, प्रेग्नन्सीत आरोग्यही राहील उत्तम-pregnancy tips do this yoga for normal delivery health will also be good during pregnancy ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: नॉर्मल डिलिव्हरीसाठी करा 'ही' योगासने, प्रेग्नन्सीत आरोग्यही राहील उत्तम

Yoga Mantra: नॉर्मल डिलिव्हरीसाठी करा 'ही' योगासने, प्रेग्नन्सीत आरोग्यही राहील उत्तम

Sep 24, 2024 10:40 AM IST

Yoga for normal delivery: गरोदरपणात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा आईसाठी तसेच पोटातील मुलासाठीही घातक ठरू शकतो. या अवस्थेत शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते.

Yoga for normal delivery
Yoga for normal delivery (freepik)

what yoga to do in pregnancy: गरोदरपणात प्रत्येक स्त्रीला अनेक नवीन अनुभवांना सामोरे जावे लागते. गर्भाच्या योग्य विकासासाठी आईचे निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे. गरोदरपणात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा आईसाठी तसेच पोटातील मुलासाठीही घातक ठरू शकतो. या अवस्थेत शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा वेळी महिलांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर गर्भवती महिलांना त्यांच्या आहाराची काळजी घेण्याचा सल्ला देतात आणि हलका व्यायामदेखील करायला सांगतात. यावेळी शरीरात अनेक हार्मोनल बदलदेखील होतात. त्यामुळे अनेक वेळा मन अस्वस्थ होते किंवा शरीराला अस्वस्थता जाणवते. यासाठी गरोदर महिलांनी रोज काही सोपी योगासने करणे फायदेशीर ठरते. गर्भवती महिलांचे शारीरिक आरोग्य तसेच मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ही आसने खूप फायदेशीर आहेत. चला तर मग याविषयी जाणून घेऊया.

१) शवासन-

या आसनाने संपूर्ण शरीराला आराम मिळतो. हे आसन करण्यासाठी, सपाट पृष्ठभागावर चटई किंवा योगा चटई पसरवा आणि आपल्या पाठीवर आरामात झोपा. आपले दोन्ही हात शरीरापासून काही अंतरावर ठेवा आणि दोन्ही पाय पसरवा. शरीर पूर्णपणे सैल सोडा. आपल्या श्वासोच्छवासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून हळू आणि आरामात श्वास घ्या. यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आराम मिळतो. हे आसन केल्याने तणावातूनही आराम मिळतो. त्यामुळे गरोदरपणात होणाऱ्या मूड स्विंगसाठी हे आसन फायदेशीर आहे.

२) सुखासन-

हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पाय पसरून आरामात बसा.आता उजवा पाय वाकवून डाव्या मांडीच्या खाली ठेवा आणि डावा पाय वाकवून उजव्या मांडीच्या खाली ठेवा. (पालथी मांडी) आपले खांदे आणि पाठ न ताणता सरळ ठेवा.आता तुमचे डोळे बंद करा आणि तुमचे लक्ष एका मध्यवर्ती बिंदूवर केंद्रित करा. शरीर सैल सोडा आणि आरामात श्वास घ्या. दहा मिनिटे या स्थितीत रहा.

*सुखासनाचे फायदे आणि खबरदारी-

हे आसन केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे मानसिक तणाव दूर होतो आणि निद्रानाशातूनही आराम मिळतो.  हे आसन तुमच्या क्षमतेनुसार करा. सुखासन करताना तुमचे गुडघे जमिनीवर ठेवा, यामुळे तुम्हाला आसन करणे सोपे होईल.

३) जानुशीर्षासन-

हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम आरामात बसा. आता एक पाय पुढे करा आणि दुसरा पाय दुमडून ठेवा. आता तुमचे धड पुढे वाकवून तुमच्या पायाच्या तळव्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत, शरीर एका रेषेत ठेवा आणि काही क्षणांसाठी श्वास रोखण्याचा प्रयत्न करा.

*फायदे आणि खबरदारी-

हे आसन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि पाठदुखीपासूनही आराम मिळतो.

हे मॉर्निंग सिकनेस, थकवा आणि तणाव कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

हे आसन शरीर लवचिक बनवते ज्यामुळे सामान्य प्रसूती होण्यास मदत होते. हे आसन करताना आपल्या क्षमतेनुसार शरीरावर जास्त दबाव टाकू नका.

तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ही योगासने करा.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

Whats_app_banner