गरोदरपणात केवळ शरीरातच नाही तर आईच्या मेंदूमध्येही होतात हे बदल, संशोधनातून झाला खुलासा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  गरोदरपणात केवळ शरीरातच नाही तर आईच्या मेंदूमध्येही होतात हे बदल, संशोधनातून झाला खुलासा

गरोदरपणात केवळ शरीरातच नाही तर आईच्या मेंदूमध्येही होतात हे बदल, संशोधनातून झाला खुलासा

Jan 26, 2025 12:01 PM IST

New Study On Pregnancy Brain : गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीनंतरच्या नैराश्यात महिलांना विसरणे असेच होत नाही. नवीन संशोधनानुसार, गर्भधारणेदरम्यान मेंदूच्या संरचनेत बदल होतात.

गरोदरपणात केवळ शरीरातच नाही तर आईच्या मेंदूमध्येही होतात हे बदल, संशोधनातून झाला खुलासा
गरोदरपणात केवळ शरीरातच नाही तर आईच्या मेंदूमध्येही होतात हे बदल, संशोधनातून झाला खुलासा

गर्भधारणेनंतर महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये प्रसूतीनंतर येणारे नैराश्य, गरोदरपणात गोष्टी विसरणे, यांसारख्या समस्यांचा समावेश आहे. या समस्या अनेक महिलांना त्रासदायक ठरू शकतात. त्या समस्या नॉर्मल असल्या तरी लोकांमध्ये याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होते.

पण स्पेनमधील एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, गर्भधारणेमुळे महिलांच्या मेंदूच्या संरचनेवर परिणाम होतो आणि अनेक त्यात बदल दिसून येतात. 

रिसर्चमध्ये समारे आल्या या गोष्टी

गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीदरम्यान महिलांमध्ये अनेक शारीरिक बदल दिसून होत असतात. पण हे बदल केवळ शारीरिक नसून त्यांचा संबंध मेंदूपर्यंतही विस्तारलेला असतो.

नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, मेंदूमध्ये आढळणाऱ्या U-shaped ग्रे मॅटरचे प्रमाण गर्भधारणेच्या शेवटच्या दिवसांमध्ये कमी होते. जे प्रसूतीच्या ६ महिन्यांनंतर काही भागात सामान्य होते. 

गर्भवती महिलेच्या मेंदूतील हे बदल हार्मोनल चढउतारांमुळे होतात, जे आई बनण्याच्या सायकलॉजी आणि मुलाच्या अटॅचमेंटशी संबंधीत आहे. तसेच, गरोदरपणात होणारे हे बदल स्त्रियांच्या सामाजिक आणि भावनिक आकलनावरही परिणाम करतात.

संशोधन काय म्हणते? 

मातृत्व न्यूरोबायोलॉजिकल आणि मानसिक बदलांना चालना देते. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे याबाबत कोणताही अभ्यास झालेला नाही. 

संशोधकाने पहिल्यांदाच माता बनणाऱ्या १२७ महिलांवर संशोधन केले.यांच्या मेंदूला गर्भधारणेपूर्वीपासून ते प्रसूतीनंतरच्या ६ महिन्यांपर्यंत ५ चुंबकीय इमेजिंग सत्रांमधून जावे लागले. ज्यामध्ये पहिली चाचणी गर्भधारणेच्या आधी, नंतर १८ आठवड्यात आणि नंतर ३४ व्या आठवड्यात केली गेली.

मुलाच्या जन्मानंतर आणि पुन्हा ६ महिन्यांनंतर हे केले गेले. याच्या मदतीने संशोधकांनी गर्भधारणेपूर्वीपासून ते प्रसूतीनंतरच्या काळात महिलांच्या मेंदूची रचना जाणून घेतली. ज्याची तुलना आणि अभ्यास करण्यात आला. इमेजिंग डेटा अभ्यास हा ग्रे मॅटर व्हॉल्यूमवर केंद्रित आहे.

जे मेंदूच्या संरचनात्मक बदलांचे विशेष सूचक आहे. संशोधकांना असे आढळून आले की गरोदर महिलेच्या मेंदूतील हे ग्रे मॅटर गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांत कमी होते आणि बाळाच्या जन्मानंतर काही वेळाने नॉर्मल होण्यास सुरुवात होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा बदल गर्भवती महिलांच्या मेंदूमध्ये दिसून आला. तर मुले नसलेल्या किंवा गर्भवती नसलेल्या महिलांच्या मेंदूमध्ये असा कोणताही बदल दिसून आला नाही.

Whats_app_banner