मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Seat Belt Precautions: गरोदरपणात सीट बेल्ट लावणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या कोणत्या चुका भारी ठरू शकतात

Seat Belt Precautions: गरोदरपणात सीट बेल्ट लावणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या कोणत्या चुका भारी ठरू शकतात

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 25, 2024 03:36 PM IST

Precautions to wear seat belt during pregnancy: कार चालवताना सीट बेल्ट लावण्याचा नियम गरोदर महिलेलाही लागू होतो का? असा प्रश्न सर्वांना पडतो. तसेच गरोदरपणात सीट बेल्ट लावणे खरंच योग्य आहे का? चला जाणून घेऊया या प्रश्नांची अचूक उत्तरे.

right way to wear seatbelt during pregnancy
right way to wear seatbelt during pregnancy (shutterstock)

Precautions to wear seat belt during pregnancy : प्रत्येक महिलेसाठी तिचे गरोदरपणाचे दिवस अतिशय नाजूक आणि कठीण असतात. या नऊ महिन्यांत तिला स्वत:चीच नव्हे तर आपल्या मुलाचीही विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र, यावेळी गरोदर महिलेला आपले दैनंदिन काम करताना अनेक अडचणी येतात. अशाच अवघड कामांपैकी एक म्हणजे गाडीचा सीट बेल्ट लावणे.

काही स्त्रिया स्वत: गाडी चालवत ऑफिसला जातात. सामान्यत: ड्रायव्हरच्या सुरक्षिततेचा विचार करून कार चालवताना सीट बेल्ट लावणे अनिवार्य असते. पण हा नियम गरोदर महिलांनाही लागू होतो का? गरोदरपणात सीट बेल्ट लावणे खरंच योग्य आहे का? सीट बेल्ट लावताना कोणत्या चुका टाळाव्यात. चला जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे…
वाचा : पुढच्या महिन्यात लग्न आहे आणि चेहरा टॅन झाला? फॉलो करा या पाच टीप्स चेहऱ्यावर येईल ग्लो

गरोदर महिलांनी सीट बेल्ट लावावा का?

सेफ ड्राइव्हसाठी प्रवास करताना प्रत्येकाने सीट बेल्ट लावणे आवश्यक मानले जाते. परंतु गरोदरपणात हे अधिक महत्वाचे ठरते. कारण गरोदर महिलेला गाडी चालवताना अचानक शॉक किंवा वेदना जाणवत नाहीत. त्यामुळे गरोदर महिलांनी आवर्जुन सीटबेल्ट लावावा.
वाचा : घरच्याघरी बनवा हा अनोखा टरबूज पिझ्झा ! खायला हेल्दी आणि बनवायला अगदी सोपा

ट्रेंडिंग न्यूज

सीट बेल्ट कसा लावाला?

नेहमी लक्षात ठेवावे की गरोदर महिलांनी सीट बेल्ट पोटाच्या वर नव्हे तर पोटाखाली बांधावा. जर आपण असे केले नाही तर स्त्री किंवा गर्भाला अस्वस्थ वाटू शकते.

सीट बेल्ट लावताना या चुका करु नका

-गरोदर महिलांनी घट्ट सीट बेल्ट बांधणे टाळावे. घट्ट सीट बेल्ट लावल्याने पेल्विक क्षेत्र आणि खालच्या ओटीपोटावर ताण येऊ शकतो. ज्यामुळे महिलेला पोटात तीव्र वेदना जाणवू शकतात.

-सीट बेल्ट थोडा सैल ठेवा जेणेकरून पोटावर जास्त घट्ट पणा जाणवणार नाही.

-सीट बेल्ट लावल्यानंतर अनेक महिलांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागतो. अशावेळी पाठदुखी टाळण्यासाठी महिलेने पाठीच्या आधारासाठीही उशीचा वापर करावा. जेणेकरुन पाठीला आधार मिळेल.
वाचा : वेडिंग रिसेप्शनमध्ये सोनाक्षी सिन्हाचा जलवा , लुकमध्ये आहेत या खास गोष्टी

-गरोदरपणात लांबचा प्रवास टाळावा. प्रवास करणे गरजेचे असेल तर थांबत प्रवास करावा.

-गरोदरपणात सुरक्षिततेसाठी सीट बेल्ट हीप्सच्यावर बांधावा।

WhatsApp channel