Homemade Moisturizer for Glowing Soft Skin: दिवाळी संपल्यानंतर लग्नाचा हंगाम सुरू होतो. अशा वेळी मुली असोत की मुले, प्रत्येक जण आपली काळजी घेऊ लागतो. जर तुम्ही लवकरच लग्न करणार असाल आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक हवी असेल, तर केमिकल मॉइश्चरायझरवर पैसे वाया घालवण्याऐवजी हे घरगुती मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचेला चमक तर मिळेलच पण चेहऱ्यावरील डागही हलके होण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी स्किनला चमक देणारी क्रीम कशी बनवायची.
- एक चिमूटभर हळद
- २ चमचे ग्लिसरीन
- २ चमचे एलोवेरा जेल
- १ चमचा लिंबाचा रस
- २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल
हे मॉइश्चरायझर बनवण्यासाठी काचेचे एयरटाइट कंटेनर घ्या. त्यात हळद आणि लिंबू टाकून चांगले मिक्स करा. नंतर त्यात ग्लिसरीन आणि एलोवेरा जेल मिक्स करा. व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल फोडून एकत्र मिक्स करा. आता या सर्व गोष्टी नीट मिसळा. हे नैसर्गिक मॉइश्चरायझर बनवून तुम्ही फ्रिजमध्ये १५ ते २० दिवस सहज ठेवू शकता.
जेव्हाही तुम्ही फेसवॉशने चेहरा स्वच्छ कराल तेव्हा हे घरगुती मॉइश्चरायझर लावा. तसेच रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावायला विसरू नका. १५-२० दिवस सतत लावल्यानंतरच तुम्हाला त्वचेवर फरक दिसू लागेल. चेहरा चमकेल आणि सोबतच सॉफ्ट आणि स्मूद होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या