Yogasana to Treat Anemia: अनेक लोकांना रक्ताची कमतरता म्हणजेच अॅनिमियाचा त्रास असतो. शरीरात रक्ताची कमतरता होण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत असू शकतात. अॅनिमियाचा त्रास असलेल्या व्यक्तीच्या शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता जाणवू लागते. ज्यामुळे त्याला थकवा, डोकेदुखी, अंगदुखी, चक्कर येणे यासारखी लक्षणे जाणवू लागतात. तुम्ही देखील अॅनिमियाच्या समस्येने त्रस्त असाल तर काही सप्लिमेंटरी औषधांसह तुम्ही योगासनांची मदत घेऊ शकता. ही दोन योगासने तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर करू शकतात. जाणून घ्या ही योगासने कोणती आहेत आणि ती कशी करावी.
योगामध्ये ब्रीदिंग एक्सरसाईजला प्राणायाम म्हणतात. उज्जाई प्राणायाम केल्याने तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. ज्यामुळे तुमचे शरीर रोगमुक्त आणि मजबूत राहते. यामुळे पचनक्रियाही चांगली राहते. परिणामी अन्नातील सर्व पोषक तत्व शरीराद्वारे चांगले शोषले जातात. ज्यामुळे शरीरात लाल रक्तपेशी तयार होतात आणि अॅनिमियाची समस्या दूर होते. याशिवाय आवाज मधुर बनवण्यासोबतच हा प्राणायाम थायरॉईडसारख्या आजारांपासूनही दूर ठेवतो.
सूर्यभेदन प्राणायामच्या नियमित सरावाने शरीरात उष्णता आणि ऊर्जा वाढते. ज्यामुळे रक्ताचे विकार लवकर दूर होतात. यासोबतच अधिक लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत होते. या प्राणायामाचा सराव केल्यास कफ, खोकला, दमा, सायनस, फुफ्फुस, हृदय आणि मूळव्याध यांसारख्या समस्यांमध्ये फायदा होतो. याशिवाय हा प्राणायाम केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक विचारांचा संचार होण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या