Yoga Mantra: लिव्हर ठेवायचंय निरोगी? दररोज करा या योगासनांचा सराव
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: लिव्हर ठेवायचंय निरोगी? दररोज करा या योगासनांचा सराव

Yoga Mantra: लिव्हर ठेवायचंय निरोगी? दररोज करा या योगासनांचा सराव

Published Mar 09, 2024 08:32 AM IST

Yoga For Liver: लिव्हर निरोगी ठेवणे खूप आवश्यक आहे. यासाठी तुम्ही काही योगासनांची मदत घेऊ शकता. आपले यकृत निरोगी ठेवण्यासाठी कोणते योगासन करता येतात ते पाहा.

धनुरासन
धनुरासन

Yoga Poses For Healthy Liver: अनेक कारणांमुळे लिव्हरचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे आपले लिव्हर कमकुवत होते आणि नंतर कॅन्सर, सिरोसिस, फॅटी लिव्हरसारखे घातक आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत आपल्या जीवनशैलीत काही बदल करून आपले आपले लिव्हर निरोगी ठेवणे आवश्यक आहे. या कामात काही योगासने तुमची मदत करू शकता. जाणून घ्या कोणती योगासने केल्याने आपले लिव्हर निरोगी राहते.

भुजंगासन

हे आसन करण्यासाठी पोटावर झोपा. हात बाजूला ठेवा. नंतर आपले हात खांद्याच्या बाजूला शरीराला लागून ठेवा. आपले डोके, छाती आणि खांदे वर उचलताना श्वास घ्या. तुमची छाती उचलताना आणि पसरवताना तुमचे कोपर थोडेसे वाकवा. आता तुमची पाठ, पोट आणि मांड्या ताणून घ्या. ३० सेकंद या आसनात राहा. नंतर किमान १-३ वेळा पुन्हा करा.

अर्ध मत्स्येंद्रासन

हे आसन करण्यासाठी सरळ बसा. आता तुमचा उजवा पाय तुमच्या डाव्या नितंबाच्या बाहेरील बाजूस ठेवा. तुमचा उजवा गुडघा पुढे करा. तुमचा डावा पाय तुमच्या उजव्या मांडीच्या बाहेरील बाजूस आणा. तुमचा डावा हात तुमच्या मागे जमिनीवर ठेवा. आणि तुमचा उजवा हात तुमच्या डाव्या पायाच्या बाहेरच्या बाजूला ठेवा. बॉडी हळू हळू फिरवा आणि दोन्ही खांद्यावर पहा. किमान १ मिनिट या स्थितीत रहा आणि नंतर दुसऱ्या बाजूला पुनरावृत्ती करा.

धनुरासन

हे आसन करण्यासाठी आपले हात बाजूला ठेवून पोटावर झोपा. आपले गुडघे वाकवा आणि आपले हात मागे घेऊन आपल्या घोट्याच्या बाहेरील कडा पकडा. शक्य असल्यास आपली छाती आणि खांदे जमिनीच्या वर उचला. पुढे पहा आणि हळू, खोल श्वास घ्या. या पोझमध्ये ३० सेकंद रहा आणि नंतर १-२ वेळा पुन्हा करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner