Body Detoxification: होळीला गोड, तेलकट पदार्थ खाल्ले? आता अशा प्रकारे करा शरीर डिटॉक्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Body Detoxification: होळीला गोड, तेलकट पदार्थ खाल्ले? आता अशा प्रकारे करा शरीर डिटॉक्स

Body Detoxification: होळीला गोड, तेलकट पदार्थ खाल्ले? आता अशा प्रकारे करा शरीर डिटॉक्स

Published Mar 26, 2024 12:22 PM IST

Post Holi Detox Tips: होळी पार्टीमध्ये भरपूर तेलकट, गोड पदार्थ खाल्ले असतील तर आता शरीर डिटॉक्स करण्यासाठी या गोष्टी करा.

होळीनंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी पद्धती
होळीनंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी पद्धती (unsplash)

Natural Ways to Detox Body After Holi: होळीच्या दिवशी घरी येणाऱ्या पाहुण्यांना अनेक प्रकारचे पदार्थ दिले जातात. ज्यामध्ये गोड आणि तेलकट पदार्थांचाही समावेश असतो. सणाच्या काळात विविध खाद्यपदार्थ पाहून कधी कधी व्यक्तीला मनावर ताबा ठेवणे कठीण होऊन जाते आणि तो गरजेपेक्षा जास्त खातो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पचनक्रिया बिघडण्याबरोबरच अस्वस्थ वाटते. अशा वेळी आपले आरोग्य राखण्यासाठी शरीर डिटॉक्स करावे लागते. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे तुमच्या शरीराला आतून आणि बाहेरून आराम करणे, स्वच्छ करणे आणि पोषण देणे. या प्रक्रियेमध्ये शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकणे आणि निरोगी पोषक घटकांचा समावेश होतो. त्यामुळे होळीला भरपूर गोड पदार्थ आणि तेलकट पदार्थ खाल्ले असतील, तर अशा प्रकारे शरीर डिटॉक्स करू शकता.

होळीनंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी या पद्धतीं फॉलो करा

लिंबू पाणी

होळीच्या दिवशी तेलकट आणि हेवी अन्न खाल्ल्यानंतर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. लिंबू पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते आणि तुम्हाला बरे वाटते.

डिटॉक्स डाएट

होळीला खाल्ले जाणारे अनेक पदार्थांमध्ये भरपूर कॅलरीज असतात. हे सर्व होळीचे पदार्थ खाण्यास हेवी असल्याने अपचन होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची आतडे स्वच्छ करण्यासाठी डिटॉक्स डायट निवडावा. यासाठी वॉटर बेस्ड डिटॉक्स डाएट फॉलो करा. असे केल्याने शरीरातील नको असलेले टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि पोषण मिळते आणि शरीर हायड्रेटेड राहते.

ध्यान

ध्यान केवळ मन शांत करून तणाव दूर करण्यात मदत करत नाही तर शरीराला डिटॉक्स करण्यास देखील मदत करते. ध्यान करताना दीर्घ आणि खोल श्वास घ्या. असे केल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.

फळे खा

फळांमध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे पेशींच्या निर्मितीसाठी खूप महत्त्वाची असतात. याशिवाय फळांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण करतात. यामुळेच गोड पदार्थ खाल्ल्यानंतर भरपूर फळे खावीत.

शरीर डिटॉक्स करण्याचे इतर मार्ग

- शरीर डिटॉक्स करण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग म्हणजे पाणी पिणे. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडत राहतात.

- होळीच्या वेळी जास्त तेलकट पदार्थ खाल्ले असतील तर काही दिवस तळलेले आणि गोड पदार्थ खाणे टाळावे.

- आहारात फायबर आणि अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवा.

- जर पचन बिघडत असेल तर ते सुधारण्यासाठी प्रोबायोटिक्स म्हणजे दही, टोमॅटो, केळी, कांदा, लसूण यांचे प्रमाण वाढवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner