Puran Poli Recipe: शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला या दिवशी शेतीपासून आराम दिला जातो आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. श्रावण महिन्याच्या अमावस्येला पोळा सण साजरा केला जातो. पोळा सणाला श्रावण महिना समाप्त होतो. यावर्षी पोळा २ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. यादिवशी प्रत्येक घरी पुरणपोळी आवर्जुन बनवली जाते. अनेक वेळा घरी लुसलुशीत पुरणपोळी बनत नाही. तुम्हाला सुद्धा हीच समस्या असेल तर ही रेसिपी फॉलो करून तुम्ही लुसलुशीत पुरणपोळी बनवू शकता. चला तर जाणून घ्या पुरणपोळीची रेसिपी
- चना डाळ
- तूप
- मैदा
- साखर किंवा गुळ
- वेलची पावडर
- जायफळ पावडर
- मीठ
- तेल
लुसलुशीत पुरळपोळी बनवण्यासाठी प्रथम एका बाउलमध्ये मैदा घ्या. त्यात थोडे तेल, मीठ टाकून पीठ मळून घ्या. ते खूप घट्ट नसेल याची काळजी घ्या. मळून झाल्यावर पीठ एका बाजूला ठेवा. आता पुरण बनवण्यासाठी चणा डाळ धुवून घ्या. त्यात थोडेसे तांदूळ घाला आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवण्यासाठी ठेवा. साधारण ४-५ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा. डाळ थंड झाल्यावर मिक्सरच्या जारमध्ये डाळ घ्या. तुम्ही पुरण बनवण्यासाठी साखर वापरणार असाल तर अर्धी साखर डाळीसोबत बारीक करा. आता गॅलवर पॅन ठेवा. त्यात थोडे तूप टाका. आता त्यात बारीक केलेले डाळीचे मिश्रण आणि उरलेली साखर टाका. तुम्ही गुळ वापरणार असाल तर बारीक केलेला गुळ घाला. आता हे मिश्रण मंद आचेवर शिजू द्या. त्यात गोळे होणार नाही याची काळजी घ्या. पुरण शिजवताना त्यात सतत चमचा ढवळत रहा. पुरण घट्ट झाले आणि त्याचे रंग बदलले की समजा की पुरण शिजले आहे. आता त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून मिक्स करा.
आता पुरणपोळी बनवण्यासाठी मैदाचा गोळा घ्या. तो पोळी प्रमाणे लाटून घ्या. त्यात पुरणाचा गोळी ठेवून सर्व बाजूंनी बंद करा. आता हे हलक्या हाताने लाटून घ्या. तवा गरम करून त्यावर पुरण पोळी टाका. मंद आचेवर दोन्ही बाजूंनी तूप लावून भाजून घ्या. तुमची पुरणपोळी तयार आहे.