मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ram Mandir: राम मंदिरासाठी खास विधीसाठी PM Modi पितायेत फक्त नारळपाणी, जाणून घ्या याचे फायदे!

Ram Mandir: राम मंदिरासाठी खास विधीसाठी PM Modi पितायेत फक्त नारळपाणी, जाणून घ्या याचे फायदे!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 21, 2024 12:55 PM IST

Benefits of Coconut Water: अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात होणार्‍या रामललाच्या अभिषेकासाठी पंतप्रधान मोदी ११ दिवस नारळ पाण्यावर आहेत असं सांगितलं जात आहे. या फळाच्या सेवांचे अनेक फायदे होतात.

PM Modi Drinks Coconut Water For Ritual of Ram Mandir
PM Modi Drinks Coconut Water For Ritual of Ram Mandir

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात होणार्‍या रामलल्लाच्या अभिषेकासाठी अवघा काही वेळ उरला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यजमान म्हणून सहभागी होणार आहेत. या खास दिनासाठी मोदीजी १२ जानेवारीपासून ११ दिवस विशेष रुटीन फॉलो करत आहेत. यामध्ये पीएम मोदी जमिनीवर घोंगडी पांघरून झोपत आहेत. याशिवाय ते संपूर्ण दिवस नारळपाणी घेत आहेत असं सांगितलं जात आहे. पीएम मोदी प्राण प्रतिष्ठेबाबत जे नियम पाळत आहेत त्यांना यम नियम म्हणतात. यावेळी एक खास 'सात्विक' आहार घ्यावा लागतो. यामध्ये कांदा, लसूण आणि इतर अनेक गोष्टींचा खाल्ल्या जात नाही. दरम्यान, पंतप्रधान मोदी दिवसातून दोनदा नारळ पाणी पित आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून या पेयाचे फायदे जाणून घेऊयात.

प्रतिकारशक्ती वाढते

नारळाच्या पाण्याने शरीराला आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे मिळतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. जे लोक रोज नारळ पाणी पितात ते आजारी कमी पडतात.

पचनासाठी ठरते फायदेशीर

नारळपाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. तसेच पोटात जळजळ, आतड्यांवरील सूज, उलट्या, जुलाब आणि अल्सरच्या समस्या कमी होतात.

निरोगी हृदयासाठी आहे गरजेचे

नारळ पाणी हृदय निरोगी ठेवते. नारळ पाणी खराब कोलेस्ट्रॉलपासून मुक्ती मिळवण्यास मदत करते. याशिवाय, रक्त गोठणे कमी करून हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी करते.

मुतखड्यावर आहे गुणकारी

किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांसाठीही नारळाचे पाणी खूप फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की रात्री नारळाचे पाणी प्यायल्याने त्याचे पौष्टिक मूल्य रात्रभर कार्य करते. मुतखडा छोटा असेल तर सकाळी खडा पडून जातो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel