मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Side Effects of Watching Reels: PM Modi ने दिला रील्सवर वेळ वाया न घालवायचा सल्ला, जाणून घ्या तोटे

Side Effects of Watching Reels: PM Modi ने दिला रील्सवर वेळ वाया न घालवायचा सल्ला, जाणून घ्या तोटे

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 30, 2024 01:23 PM IST

Pariksha Pe Charcha: अलीकडेच, परीक्षांवरील चर्चेच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी मुलांना रिल्सवर वेळ वाया घालवू नका, असा सल्ला दिला. तुम्हीही खाता-पिता किंवा बसता रील बघत राहता का?, मग जाणून घ्या त्याचे तोटे

Mental Health Care Tips
Mental Health Care Tips (Freepik)

Social Media Addiction: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ जानेवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात संबोधित केले. यावेळी शाळकरी मुले आणि त्यांच्या पालकांचा सहभाग होता. यावेळी पंतप्रधानांनी मुलांना रिल्स बघण्यात वेळ वाया घालवू नका असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, रील बघण्यात वेळ वाया घालवू नका, अभ्यासावर लक्ष द्या. या वयात मुलांना चांगली झोप मिळायला हवी, पुरेशी झोप आणि चांगला आहार खूप महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईल पाहण्यासाठी एक वेळ ठरवण्याचा सल्लाही पंतप्रधान मोदी यांनी दिला.

पंतप्रधान असेही म्हणाले की ज्याप्रमाणे मोबाईल रिचार्ज करावा लागतो, त्याचप्रमाणे बॉडीही रिचार्ज करावी. अभ्यास करताना फक्त अभ्यास करत राहणे किंवा खेळत राहणे चांगले नाही. जीवनात बॅलेन्स आवश्यक आहे. म्हणूनच जाणून घ्या की रिल्स बघत वेळ वाया घालवण्याचा काय तोटा होऊ शकतो.

'रील्स' पाहण्याचे दुष्परिणाम

> तुम्ही खूप रील्स पाहिल्यास तुम्हाला त्याचे व्यसन गंभीरपणे लागू शकते. यामुळे भविष्यात अशी स्थिती निर्माण होऊ शकते जेव्हा आपण रील पाहिल्याशिवाय राहू शकणार नाही.

> खूप रील्स पाहण्याच्या सवयीमुळे झोपेचे वेळापत्रक बिघडते, जे मानसिक आरोग्यासाठी अजिबात ठीक नाही.

> जास्त रिल्स पाहण्याची सवय असेल, तर तुम्हाला बीपीमध्ये चढ-उतार दिसू शकतात, ही सवय तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.

> या सवयीमुळे तुम्ही सामाजिक जीवनापासून तुम्ही लांब जाता आणि केवळ आभासी जीवन वास्तव म्हणून स्वीकारता.

> अनेकदा लोक रील पाहिल्यानंतर स्वतःची तुलना इतरांशी करू लागतात, ज्यामुळे भविष्यात नैराश्य देखील येऊ शकते.

> वैयक्तिक जीवनावरही याचा परिणाम होतो. सतत फोनवर असण्याने तुमची लाइफस्टाइल बिघडते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel