Importance of Kheer Making in Pitru Paksha: हिंदू पंचागनुसार यावर्षी पितृपक्ष १७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ज्याचा समारोप २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. असे मानले जाते की पितृ पक्षात पितर पृथ्वीवर येतात आणि आशीर्वाद देतात. या वेळी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी लोक तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मण भोजन करतात. श्राद्धात प्रसादाशी संबंधित काही खास नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. असाच एक नियम श्राद्धातील खीरच्या प्रसादाबाबतही सांगण्यात आला आहे. खरं तर पितृ पक्षाच्या जेवणात खीर नक्कीच बनवली जाते. चला तर जाणून घेऊया खीर बनवण्याचे महत्त्व आणि याची सोपी रेसिपी.
घरी येणाऱ्या पाहुण्याला मिठाई किंवा गोड पदार्थ खाऊ घालून स्वागत केल्यास पाहुण्याला पूर्ण तृप्तीचा अनुभव येतो, असे मानले जाते. याच भावनेने पितरांच्या पूर्ण तृप्तीसाठी पितृ पक्षात खीर बनवली जाते. त्याचबरोबर श्राद्धात खीर बनवण्यामागची एक बाजू अशीही मानली जाते की, श्राद्ध पक्षाच्या आधीचा काळ पावसाचा असतो. पूर्वीच्या काळी पावसामुळे लोक आपला बराचसा वेळ घरातच उपवास करण्यात घालवत असत. ज्यामुळे त्यांचे शरीर कमकुवत व्हायचे. अशा तऱ्हेने पितृ पक्षाचे १६ दिवस खीर-पुरी खाऊन आपल्या शरीराला ऊर्जा देत असत.
- दोन लिटर दूध
- एक वाटी दूध पावडर
- एक चमचा तूप
- अर्धा कप साखर
- एक कप काजू
- अर्धा कप बदाम
- दोन चमचे मनुका
- थोडा पिस्ता
- एक चमचा चिरोंजी
- चिमूटभर केशर
- चिमूटभर वेलची पूड
पितृ पक्षात खीर बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये काजू आणि बदाम ड्राय रोस्ट करून घ्या. जेव्हा काजू आणि बदाम दोन्ही थोडे कुरकुरीत होतील तेव्हा ते थंड करून ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यावेत. आता एका कढईत तूप गरम करून त्यात मिल्क पावडर आणि ३/४ कप दूध घालून मंद आचेवर सतत ढवळत शिजवावे. दूध कोरडे पडू लागल्यावर समजून घ्या की, खीरसाठी मावा तयार आहे. आता एका कढईत उरलेले दूध आणि केशर मिसळून उकळेपर्यंत गरम करावे. नंतर दुधातच बारीक केलेले ड्राय फ्रूट्स घाला. आता मंद आचेवर दूध सुमारे १० मिनिटे शिजवून घ्या. नंतर आधीच तयार केलेला मावा दुधात घाला. आता दुधात साखर घालून मंद आचेवर घट्ट होऊ द्या.
आता दुसऱ्या कढईत तूप गरम करून त्यात काजू, बदाम, पिस्ता, चिरोंजी घालून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. खीर मलईदार होत आहे असे वाटल्यावर त्यात भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड घालून झाकून आणखी काही वेळ शिजवावे. पितृ पक्षासाठी तुमची खीर तयार आहे.