मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pink Smoothie: दिवसभर उत्साही राहण्यासाठी या गुलाबी ड्रिंकने करा सुरुवात, वाचा रेसिपी

Pink Smoothie: दिवसभर उत्साही राहण्यासाठी या गुलाबी ड्रिंकने करा सुरुवात, वाचा रेसिपी

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 11, 2024 10:59 AM IST

Pink Smoothie: दिवसभर उत्साही राहण्याचा सर्वांचा प्रयत्न करतो. पण त्यासाठी काय करावे नेमके असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया...

Pink Smoothie
Pink Smoothie

बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसभरात लवकर थकवा येतो. कधी कामाचा तणाव, तर कधी ऑफिसमध्ये कामाचा लोड तर कधी कुटुंबीयांची जबाबदारीमुळे शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे शरीराची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. अशा वेळी दिवसभर शरीराला ऊर्जा देण्यासाठी सकाळी उठल्यानंतर पहिले काय खावे? असा प्रश्न पडतो. जर तुम्ही उठल्या उठल्या गुलाबी ड्रिंक प्यायलात तर तुम्हाला चांगली ऊर्जा मिळेल. तसेच दिवस उत्साहात जाईल. पण आता ही गुलाबी ड्रिंक कशी बनवायची चला जाणून घेऊया...
वाचा: हरभऱ्यामध्ये लवकर किड लागते का? यापासून बचाव करण्यासाठी ट्राय करा हे घरगुती उपाय

ट्रेंडिंग न्यूज

पिंक स्मूदी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

-एक ग्लास पाणी

-तुम्हाला आवडत असलेली प्रथिन पावडर

-बदाम ८ ते १०

-अंबाडी बिया

-सूर्यफूल बिया

-भोपळ्याच्या बिया

कशी बनवावी स्मूदी

-सर्वात प्रथम स्मूदी बनवण्यासाठी बदाम ग्राइंडरच्या भांड्यात टाका

-त्यामध्ये थोडे पाणी घालून पेस्ट बनवा

-आता त्यात तुमच्या आवडीची प्रोटीन पावडर घाला

-त्यानंतर स्ट्रॉबेरी घालून बारीक करा

-तुमची गुलाबी स्मूदी तयार आहे

-तुम्ही ती काही काळ थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवू शकता

-स्मूदी पिताना त्यावर भोपळा आणि सूर्यफुलाच्या बिया टाका

स्मूदी प्यायल्याने दिवसभर उत्साही राहा

तुम्ही सकाळी उठल्यावर काय खाता यावर तुमचा पूर्ण दिवस अवलंबीत असतो. उठल्या उठल्या खालेल्या अन्नाने तुम्हाला दिवसभराची ऊर्जा मिळते. तज्ञ नेहमीच स्मूदी पिण्याचा सल्ला देतात. स्मूदीमध्ये शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषक घटक असतात. खास करुन पिंक स्मूदी शरीरासाठी उपयोगी ठरते. या स्मूदीमुळे तुम्हाला चांगली ऊर्जा मिळते.
वाचा: घरी पाळीव श्वान आणताय? मग 'या' पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा

चहा आणि कॉफी ऐवजी प्या स्मूदी

दिवसाची सुरुवात ही अनेकजण चहा किंवा कॉफी पिऊन करतात. त्यात प्रथिने आणि निरोगी चरबी असतात ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जा मिळते. जर तुम्ही गुलाबी स्मूदी प्यायलात तर तुम्हाला पौष्टीक मूल्य मिळतील. कारण या स्मूदीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच त्यामध्ये टाकलेल्या बिया ह्या फायबरने पूर्ण असतात. त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जा मिळते.

WhatsApp channel