Basic Good Manners Etiquette Rules: प्रत्येक व्यक्तीला जीवनातील काही मूलभूत गुड मॅनर्स बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. ते गुड मॅनर म्हणजे आयुष्यात यशस्वी होण्याची शाश्वती असते. कारण या मूलभूत नियमांचा अभाव तुम्हाला कधी कधी अपयशी ठरवू शकतो. सहसा जेव्हा आपण बेसिक मॅनर्स बद्दल बोलतो तेव्हा आपण हे फक्त मुलांना समजावून सांगतो किंवा त्यांना शिकवतो. पण मोठं झाल्यानंतरही काही गोष्टी पाळणं गरजेचं असतं. फक्त लहान मुलेच नाही तर मोठ्यांनी सुद्धा गुड मॅनरचे काही बेसिक रूल्स फॉलो करणे आवश्यक असते. त्यापैकी हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत.
घरातील ज्येष्ठ मंडळी अनेकदा आपल्याला या गोष्टी समजावून सांगत असतात आणि या गोष्टी आजही यशाचे मंत्र आहेत. या गोष्टी फक्त लहान मुलांनीच नाही तर मोठ्यांनी सुद्धा फॉलो केल्या पाहिजे.
१. ज्या गोष्टी आपल्याला माहित नसतात त्याबद्दल कधीही बोलू नका. कोणत्याही मुद्द्यावर नेहमी पूर्ण माहिती नंतरच आपले म्हणणे ठेवा.
२. जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला आमंत्रण दिले नसेल तर अशा ठिकाणी कधीही जाऊ नये.
३. ज्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीत अशा गोष्टींमध्ये कधीही ढवळाढवळ करू नका. हे बेसिक मॅनर घरापासून ते बाहेरपर्यंत प्रत्येक ठिकाणी गरजेची आहे.
४. जर तुम्ही कोणाच्या घरी गेला असाल तर परवानगीशिवाय फ्रीज कधीही उघडू नये. हे एक अत्यंत बेसिक मॅनर आहे, जे आपण आपल्या मुलांना नक्कीच शिकवले पाहिजे.
५. रात्री १० नंतर कोणालाही फोन करू नये, असेही बेसिक रूलमध्ये म्हटले आहे. आपत्कालीन परिस्थिती नसल्यास किंवा ओळखीच्या व्यक्तीने परवानगी दिल्याशिवाय रात्री १० वाजता नंतर फोन करू नये.
६. जर तुम्ही कधी कोणाच्या घरी गेलात तर परवानगीशिवाय त्याच्या बेडरूममध्ये जाऊ नका.
७. दुपारच्या जेवणाच्या वेळी कोणालाही भेटायला जाऊ नये.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या