Benefits of Salt Water Bath: कोणताही पदार्थ कितीही चविष्ट असला तरी त्यातील मीठ थोडे कमी जास्त झाले तर पदार्थाची चव खराब होते. यावरूनच आपण आपल्या जीवनात मिठाचे महत्त्व किती आहे याचा अंदाज लावू शकतो. पण हे केवळ किचनपुरते मर्यादित नाही. शरीर आणि मन दोन्हीसाठी मीठाचे आश्चर्यकारक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याविषयी सांगणार आहोत. ही काही नवीन संकल्पना नाही, तर प्राचीन काळापासून लोक याचा वापर करत आले आहेत. आज आम्ही तुम्हाला योग्य पद्धत आणि अनेक फायद्यांविषयी सांगणार आहोत.
सॉल्ट बाथसाठी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात एक ते दोन चमचे मीठ मिसळावे लागते. यासाठी सैंधव मीठ चांगले आहे परंतु तुम्ही सामान्य मीठ देखील वापरू शकता. तसे तर हलक्या गरम पाण्यात सॉल्ट बाथ घेणे अधिक फायदेशीर ठरते. पण उन्हाळ्यात तुम्ही थंड पाण्याने सुद्धा सॉल्ट बाथ घेऊ शकता. खरं तर मीठामध्ये सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी अनेक मिनरल्स आढळतात, जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. चला तर मग जाणून घेऊया सॉल्ट बाथच्या काही फायद्यांविषयी.
पाण्यात थोडे मीठ घालून आंघोळ केल्यास तुमचे शरीर खूप चांगले स्वच्छ होते. यामुळे हळूहळू साचलेली घाणही दूर होते. वर्षानुवर्षे जमा झालेल्या मृत पेशीही साफ होऊ लागतात. जर तुम्ही काही दिवस मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तर तुमच्या त्वचेवर वेगळाच ग्लो दिसतो. ती पूर्वीपेक्षा स्वच्छ, मऊ आणि फ्रेश दिसते. कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन आणि त्वचेवरील डागही दूर होतात.
तुम्हाला हे ऐकायला विचित्र वाटेल, पण हे १०० टक्के खरे आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आजपासूनच सॉल्ट बाथ करायला सुरुवात करा. खरं तर मीठ आपल्या शरीरातील ब्लॉक स्किन पोर्स उघडण्याचं काम करते, ज्यामुळे आपल्याला जास्त घाम येतो आणि चरबी लवकर बर्न होते.
दिवसभराच्या थकवा, तणावानंतर तुम्हाला थोडी विश्रांती हवी असेल तर सॉल्ट बाथ तुमची खूप मदत करू शकते. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यावर मूड एकदम रिलॅक्स होतो. शरीरातील स्नायूंना बराच आराम मिळतो आणि शरीराचा थकवा दूर होतो. त्यामुळे ऑफिसमधून आल्यावर मिठाच्या पाण्याने आंघोळ करावी.
जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुमचे केस खूप कोरडे आणि निर्जीव झाले आहेत तर एकदा सॉल्ट बाथ नक्की ट्राय करा. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने केसांचे आरोग्यही सुधारते. यामुळे कोंड्याची समस्या दूर होते तसेच केस अधिक चमकदार आणि रेशमी होतात.
शरीरासह आपल्या सभोवतालची नकारात्मकता दूर होण्यास खूप मदत होते. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या आयुष्यात सर्व काही नकारात्मक होत असेल तर मिठाच्या पाण्याने अंघोळ करण्यास सुरुवात करा. यामुळे तुमच्यावरील सर्व नकारात्मकता दूर होईल आणि तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे ठीक राहाल. यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी येते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या