Period Tips: कमी वयात का येतेय मासिक पाळी? कोणत्या वयात पिरियड्स येणे योग्य? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Period Tips: कमी वयात का येतेय मासिक पाळी? कोणत्या वयात पिरियड्स येणे योग्य? जाणून घ्या

Period Tips: कमी वयात का येतेय मासिक पाळी? कोणत्या वयात पिरियड्स येणे योग्य? जाणून घ्या

Nov 19, 2024 04:06 PM IST

First Period Marathi: मासिक पाळी साधारणपणे १२ ते १५ वयोगटातील मुलींना येते. मात्र, आजकाल ८ वर्षे आणि ९ वर्षे वयाच्या मुलींनाही मासिक पाळी येऊ लागली आहे.

Reasons for early menstruation marathi
Reasons for early menstruation marathi (freepik)

Reasons for early menstruation marathi:  पीरियड म्हणजेच मासिक हा मुलींच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. मासिक पाळी साधारणपणे १२ ते १५ वयोगटातील मुलींना येते. मात्र, आजकाल ८ वर्षे आणि ९ वर्षे वयाच्या मुलींनाही मासिक पाळी येऊ लागली आहे. एवढ्या लहान वयात मासिक पाळी आल्यावर मुलींना मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. चला जाणून घेऊया कमी वयात मासिक पाळी येण्यामागील कारण काय आहे आणि या काळात कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे…

लहान वयात मासिक पाळी का येते?

मुलींमध्ये लवकर मासिक पाळी येण्याचे पहिले कारण म्हणजे हार्मोनल बदल होय. ज्या मुलींच्या शरीरात हार्मोनल बदल होतात त्यांना मासिक पाळी लवकर येऊ लागते. याशिवाय काही वेळा असंतुलित खाण्याच्या सवयींमुळेही मासिक पाळी येऊ लागते. जर तुम्ही विचार करत असाल की मुलींना वयाच्या आधीच मासिक पाळी का येते, तर याचे मुख्य कारण म्हणजे वाढते वजन. जर 8 ते 9 वयोगटातील मुलीचे वजन झपाट्याने वाढत असेल, तर यामुळे हार्मोनल बदल देखील होतात ज्यामुळे तिला मासिक पाळी वेळेपूर्वी येते.

मासिक पाळी येण्यासाठी योग्य वय काय आहे?

मुलींना पहिल्यांदा मासिक पाळी येण्यासाठी योग्य वय हे १२ ते १५ वर्षांच्या दरम्यान आहे. जर मासिक पाळी लवकर येत असेल, तर याचे कारण म्हणजे तुमच्या मुलींच्या शरीरात काही हार्मोनल बदल झाले आहेत.

मासिक पाळी दरम्यान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

मासिक पाळीच्या काळात मुलींना स्वतःच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे लागते. दिवसभरात किमान दोनदा पॅड बदला. याशिवाय स्वतःला स्वच्छ ठेवा. जेवणाकडेही लक्ष द्या. पीरियड्समध्ये खारट पदार्थ, जास्त गोड, कॉफी, तळलेले पदार्थ आणि आंबट पदार्थ खाणे टाळा.

या टिप्स फॉलो करा-

तज्ज्ञ सांगतात की, पालकांनी आपल्या मुलींना जन्मापासूनच शारीरिक हालचाली करायला लावल्या पाहिजेत. लहानपणापासूनच अभ्यासाचे दडपण निर्माण करू नका. मुलींना ताण देऊ नका. त्यांना त्यांच्या आहारात अधिक फळे द्या. बाहेरचे खाणे बंद करा. दूध दही चीजवर लक्ष केंद्रित करा. तसेच लहान वयातच मासिक पाळी आल्याने मुलांची उंची कमी होते, त्यामुळे मुलींना शक्य तितके धावायला आणि सायकल चालवायला सांगा.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner