Period Pain: मासिक पाळीत पोटात भयानक वेदना होतात, पायही दुखतात? 'हे' उपाय केल्यास लगेच मिळेल आराम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Period Pain: मासिक पाळीत पोटात भयानक वेदना होतात, पायही दुखतात? 'हे' उपाय केल्यास लगेच मिळेल आराम

Period Pain: मासिक पाळीत पोटात भयानक वेदना होतात, पायही दुखतात? 'हे' उपाय केल्यास लगेच मिळेल आराम

Published Aug 02, 2024 10:29 AM IST

Home Remedies for Period Pain: मासिक पाळीमध्ये स्त्रियांना पोट दुखणे, पायात गोळे येणे, कंबर दुखणे, डोकेदुखी अशा विविध समस्या जाणवतात. काही स्त्रियांचे पोटात दुखणे हे सामान्य असते. तर काही स्त्रिया अशा असतात ज्यांना मासिक पाळीदरम्यान पोटात भयानक वेदना होतात.

period pain
period pain

Home Remedies for Period Pain: स्त्रियांना प्रत्येक महिन्याला मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना विविध दुखण्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी त्यांच्या शरीरात तर बदल होतातच शिवाय काहींची मानसिक स्थितीही बिघडते. मासिक पाळीमध्ये स्त्रियांना पोट दुखणे, पायात गोळे येणे, कंबर दुखणे, डोकेदुखी अशा विविध समस्या जाणवतात. काही स्त्रियांचे पोटात दुखणे हे सामान्य असते. तर काही स्त्रिया अशा असतात ज्यांना मासिक पाळीदरम्यान पोटात भयानक वेदना होतात. अनेकांना तर डॉक्टरांकडे जावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी हे फारच त्रासदायक असते. प्रत्येक महिन्याला असे होत असल्याने अनेकांना मासिक पाळीच्या दिवसांची चिंता वाटू लागते. 

मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जी कोणत्याही महिलेला टाळता येत नाही. पण त्यामुळे निर्माण होणाऱ्या भयानक वेदना आणि इतर अस्वस्थता नक्कीच कमी करता येतात. महिलांनी जर मासिक पाळीदरम्यान काही गोष्टींची खबरदारी घेतली आणि काही गोष्टी टाळलया तर, त्यांना मासिक पाळीच्या काळात होणारा त्रास सहज कमी करता येऊ शकतो. खासकरून महिलांना या काळात आपल्या आहारावर लक्ष देणे आवश्यक असते. आज आपण या समस्येबाबत कोणते घरगुती उपाय करता येतात हे जाणून घेणार आहोत.

आल्याचे सेवन करणे फायदेशीर

आले हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आवर्जून आढळणारा पदार्थ आहे. आले जेवणाची चव तर वाढवतेच शिवाय अनेक आजारांमध्ये उपयोगी ठरते. मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठीदेखील आल्याचा वापर खूप फायदेशीर आहे. आल्याचा एक छोटासा तुकडा घेऊन तो एक कप पाण्यात उकळा. हे पाणी पिऊन टाका त्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

ओव्याचा वापर फायदेशीर

मासिक पाळीच्या काळात महिलांमध्ये गॅसची समस्या वाढते. गॅसच्या समस्येमुळेही पोटदुखी मोठ्या प्रमाणात होते. यावर मात करण्यासाठी ओवा हा उत्तम पर्याय आहे. अर्धा चमचा ओव्यामध्ये अर्धा चमचा मीठ मिसळून कोमट पाण्यात प्यायल्याने मासिक पाळीतील पोटदुखीपासून त्वरित आराम मिळतो. शिवाय पचनक्रियाही सुधारते.

तुळशीचा वापर फायदेशीर

तुळशीला मोठे धार्मिक महत्व आहे. त्याचप्रमाणे तुळशीला औषधीय म्हत्वसुद्धा आहे. तुळशी एक नैसर्गिक वेदनाशामक आणि अँटीबायोटिक आहे. तुम्हालाही मासिक पाळीत तीव्र वेदना होत असतील तर, चहा बनवताना त्यात तुळशीची पाने टाकून उकळा, त्याने तुमच्या वेदना थांबतील आणि तुम्हाला आरामही मिळेल.

फळे आणि हिरव्या पालेभाज्या

मासिक पाळीच्या दरम्यान तुम्हाला पायात गोळे येणे पोटात दुखणे यांसारख्या समस्या होत असतील, तर तुम्हाला त्याकाळात फळे आणि हिरव्या पालेभाज्या खाणे अत्यंत उपयुक्त ठरेल. यातून तुम्हाला आवश्यक असणारे फायबर, जीवनसत्वे मिळतील. खासकरून पपई हा फळ मासिक पाळीमध्ये आवर्जून खायला हवा.ज्यामुळे तुमचे दुखणे तर दूर होईलच शिवाय तुम्हाला ऊर्जाही वाटेल. शिवाय याकाळात तेलकट, मसाल्याचे पदार्थ आणि साखरेचे पदार्थ खाण्याचे टाळा.

दुग्धजन्य पदार्थांचा वापर

तज्ज्ञांच्या मते, ज्या महिलांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता अधिक असते, त्यांना मासिक पाळीत जास्त वेदना होतात. त्यामुळे अशा वेळी वेदना टाळण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे. असे केल्याने तुमच्या शरीरातील कॅल्शिअमची कमतरता भरून निघते आणि तुमच्या वेदना कमी होतात.

 

Whats_app_banner