Gajar halwa : थंडीच्या मोसमात घ्या गरमागरम स्वादिष्ट गाजर हलव्याच्या आस्वाद! ‘या’ टिप्स वापराल तर बनेल आणखी खमंग
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Gajar halwa : थंडीच्या मोसमात घ्या गरमागरम स्वादिष्ट गाजर हलव्याच्या आस्वाद! ‘या’ टिप्स वापराल तर बनेल आणखी खमंग

Gajar halwa : थंडीच्या मोसमात घ्या गरमागरम स्वादिष्ट गाजर हलव्याच्या आस्वाद! ‘या’ टिप्स वापराल तर बनेल आणखी खमंग

Nov 25, 2024 12:51 PM IST

Gajar Halwa Recipe Tips : थंडीच्या हंगामात गाजराचा हलवा खूप खाल्ला जातो. बऱ्याच लोकांना हा चविष्ट पदार्थ घरी बनवायला आवडतो. तुम्हीही हा हलवा घरीच बनवत असाल, तर तो आणखी खमंग व्हावा म्हणून या टिप्स फॉलो करा.

थंडीच्या मोसमात घ्या गरम गरम स्वादिष्ट गाजर हलव्याच्या आस्वाद!
थंडीच्या मोसमात घ्या गरम गरम स्वादिष्ट गाजर हलव्याच्या आस्वाद!

Gajar Halwa Recipe Tips In Marathi : थंडीच्या गुलाबी मोसमात गरमागरम गाजराचा हलवा खूप खाल्ला जातो. हिवाळ्यातील या खास पदार्थाचे नाव ऐकताच त्याची चव जीभेवर रेंगाळू लागते. हिवाळ्याच्या हंगामात गरमागरम गाजराच्या हलव्याची चव जबरदस्त लागते. बाजारात अनेक मिठाईच्या दुकानात गाजराचा हलवा उपलब्ध असतो. मात्र, काही लोक हा पदार्थ घरीच बनवून खाण्याला पसंती देतात. तुम्हालाही गाजराचा हलवा घरी बनवायचा असेल आणि त्याची लज्जत आणखी वाढवायची असेल, तर या टिप्स नक्की फॉलो करा.

योग्य गाजर निवडा

चविष्ट गाजराचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम योग्य गाजर निवडा. हलव्यासाठी ताजे लाल-केशरी गाजरच घ्या. या प्रकारच्या गाजराची चव खूप चांगली असते. हलवा बनवण्यासाठी चुकूनही जाड गाजर घेऊ नका. या ऐवजी लांब, पातळ गाजर निवडा.

व्यवस्थित किसून घ्या

गाजराचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम गाजर चांगले धुवून घ्यावेत. नंतर सोलून टॉवेलने वाळवावे. आता आपल्याकडे असलेल्या किसणीचा जाड भाग तपासून, त्यावर एकसमान किसून घ्यावे. हलवा तयार करण्यासाठी किसणीचा पातळ भाग वापरणे टाळा. कारण यामुळे आपल्या हलव्याचा रंग आणि पोत खराब होऊ शकतो.

Leftover Food Recipes: रात्रीच्या उरलेल्या डाळीपासून बनवा हेल्दी नाश्ता, इथे पाहा सोपी रेसिपी

तूपाचा वापर

गाजराच्या हलव्यासाठी पुरेशा प्रमाणात तूप आवश्यक असते. हलवा घट्ट झाल्यावर त्यात तूप घालावे. नंतर हळूहळू चमकदार केशरी ते गडद केशरी रंग होईपर्यंत हलवा शिजवावा.

फुल क्रीम मिल्क वापरा

बाजारात विकत मिळतो तसाच गाजराचा हलवा घरी बनवण्यासाठी फुल क्रीम मिल्कचा वापर करा. यामुळे चव वाढते आणि त्याचबरोबर हलव्याला मलईदार घट्टपणा येतो. बाजारासारखाच पोत हवा असेल, तर दूध घालण्यापूर्वी एक वाटी क्रीम घाला.

जास्त साखरेमुळे चव होईल खराब

हलव्यात साखर व्यवस्थित प्रमाणात ठेवा. तुम्ही हलव्यात मावा घालत असाल, तर कमी साखर घाला. कारण, मावा आणि गाजर दोन्हीमध्ये नैसर्गिक गोडवा असतो.

गाजर हलवा
गाजर हलवा



कसा बनवाल गाजराचा हलवा?

 

साहित्य:

१ किलो गाजर (चांगले किसलेले)

१ लिटर दूध

१ कप साखर (चवीनुसार कमी-जास्त करा)

४-५ टेबलस्पून तूप

१०-१२ काजू, बदाम, पिस्ते (चिरलेले)

१/२ टीस्पून वेलची पूड

१/२ कप खवा (ऐच्छिक)

कृती:

> एका जाड बुडाच्या कढईत १ टेबलस्पून तूप गरम करा.

> त्यात किसलेले गाजर घालून ५-७ मिनिटे परतून घ्या.

> गाजरात दूध घालून चांगले ढवळा.

> गॅस मध्यम आचेवर ठेवा व गाजर मऊ होईपर्यंत आणि दूध आटून जाईपर्यंत शिजवा.

> अधूनमधून हलवत राहा जेणेकरून गाजर खाली लागू नये.

> दूध जवळजवळ आटल्यावर साखर घालून चांगले मिसळा.

> साखर विरघळल्यानंतर २-३ टेबलस्पून तूप घालून हलवा.

> खवा घालून मिश्रण हलवून २-३ मिनिटे परता.

> सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ते) घालून चांगले ढवळा.

> शेवटी वेलची पूड घालून हलवून घ्या.

टीप:

  • गाजर हलवा गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे सर्व्ह करा.
  • गाजर हलवा फ्रीजमध्ये ठेवून ५-६ दिवस सहज टिकतो.
  • खव्याऐवजी दूध पावडर देखील वापरू शकता.

Whats_app_banner