Side Effect Of Masoor Dal: मसूर डाळ हा भारतीय स्वयंपाकघरातील सर्वात आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. या मसूरला लाल मसूर असेही म्हणतात. या मसूरमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बी६, लोह, कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम, आहारातील आवश्यक फायबर यांसारखे पोषण तत्वे भरपूर असतात. त्यात हाय प्रोटीन आणि कमी कॅलरीज असतात. अशा स्थितीत या डाळीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. परंतु मसूर डाळ इतके फायदेशीर असूनही त्याचे काही दुष्परिणामदेखील आहेत. तज्ज्ञांच्या मते, मसूर डाळ खाणे काही लोकांनी आवर्जून टाळायला हवं.
किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मसूरचे सेवन हानिकारक ठरू शकते. वास्तविक या डाळीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. अशा परिस्थितीत किडनीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी ही डाळ खाल्ल्यास किडनी स्टोनची समस्या वाढू शकते. त्यामुळे या लोकांनी शक्यतो मसूर डाळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावी.
ज्या लोकांना जास्त यूरिक ॲसिडची समस्या आहे त्यांनी मसूर डाळ खाणे टाळावे. आम्ही तुम्हाला सांगतो की मसूरमध्ये प्युरीन आणि यूरिक ॲसिड असते ज्यांना किडनीशी संबंधित समस्या आहेत त्यांनी देखील मसूर खाणे टाळावे, कारण अशा लोकांना ऑक्सलेट कमी घेण्याचा सल्ला दिला जातो.
मसूर डाळ खाल्ल्याने ॲलर्जीचा धोकाही वाढू शकतो. हे दुर्मिळ असले तरी, काही व्यक्तींना मसूर डाळ व्यतिरिक्त इतर डाळींची ॲलर्जी असू शकते. याशिवाय या मसूर डाळीच्या सेवनाने खाज येणे, सूज येणे आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या होऊ शकतात. त्यामुळे अशी समस्या जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
मसूर डाळीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ती खाल्ल्याने कधीकधी गॅसची समस्या उद्भवू शकते. तसेच या मसूर डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्याचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश केल्यास वजन वाढण्याचा आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होण्याचा धोका असतो.
मसूर डाळ खात असाल तर चिंता करण्याची गरज नाही. फक्त योग्य प्रमाणात खाल्यास मसूरचे फायदे मिळू शकतात. लेखात नमूद केलेल्या शारीरिक समस्या टाळण्यासाठी तुम्ही मसूरचे सेवन मर्यादित प्रमाणात करू शकता. त्यामुळेच तुम्हाला जर वरील कोणताही त्रास असेल तर मसूर डाळ किती प्रमाणात खावी याबाबत एकदा तज्ज्ञांकडून सल्ला घेतल्यास कोणतीच अडचण येणार नाही.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)