मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  या राशी असलेले लोक असतात प्रचंड रोमँटिक; नात्यात वाढवतात प्रेम आणि जिव्हाळा
Astrology Love And Reletionship
Astrology Love And Reletionship (HT)
14 May 2022, 4:32 AM ISTAtik Sikandar Shaikh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
14 May 2022, 4:32 AM IST
  • काही विशिष्ट राशितील लोक हे अत्यंत रोमँटिक असतात. या राशितील लोकांशी लग्न झाल्यास त्यामुळं त्यांचं आणि त्यांच्या पार्टनरचं वैवाहिक आयुष्य आनंददायी होतं.

Astrology : ज्योतिषशास्त्रात १२ राशिंचा उल्लेख करण्यात आला आहे. लोकांना कुडलीतील ग्रहांच्या हालचालींनुसार त्याचं राशिभविष्य अवलंबून असतं. अनेक लोक असे असतात की जे फक्त राशिवरूनच एखाद्याचं कॅरेक्टर ठरवत असतात. कारण व्यक्तीची जी राशि आहे, त्यावरूनच भविष्यातल्या अनेक गोष्टी ठरलेल्या असतात. याशिवाय काही लोक किती प्रेमळ आणि रोमँटिक आहेत हे सुद्धा त्यांच्या राशिंवर अवलंबून असतं. काही विशिष्ठ राशि असलेले लोक हे इतरांच्या तुलनेत अधिक प्रेमळ आणि रोमँटिक असतात, असंही सांगितलं जातं. त्यामुळं अशा लोकांच्या राशि कोणकोणत्या आहेत, हे जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

मेष : राशिभविष्यात येणारी ही पहिली राशि आहे. प्रेम आणि रिलेशनशिपच्या बाबतीत ही राशि फार प्रसिद्ध मानली जाते. ही राशि असलेले लोक हे प्रेम आणि सेक्स लाईफच्या बाबतील अतिशय चांगले मानले जातात.

मीन : या राशिवाल्या पुरुषांना नेहमी 'सेक्स गॉड' म्हटलं जातं. नात्यात नव्या पद्धतीनं आनंद निर्माण करणं आणि पार्टनरला खुश ठेवण्यात मीन ही राशि असलेले लोक एक्स्पर्ट असतात. त्यामुळं या राशिवाल्यांसोबत अनेक महिलांना नात्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होते.

कन्या : कन्या ही रास असलेल्या लोकांना 'बेडरूम का बेताज बादशाह' म्हणून ओळखलं जातं. ही राशी असलेलेल लोक नेहमीच पार्टनरला खुश ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लूप्त्या करत असतात.

कर्क : या राशिवाल्यांना प्रेम आणि रिलेशनशिपबाबत अधिक जिव्हाळा आणि भावनात्मक अटॅचमेंट असते. त्यामुळं या राशिवाल्यांना प्रेम आणि सेक्ससाठी अनेक महिला परफेक्ट मानतात. याशिवाय ही राशि असलेले लोक आपल्या इच्छा आणि आकांक्षा उघडपणे बोलून दाखवत असतात.

मकर : मकर राशिवाल्यांच्या डोक्यावर शनिदेवाचा हात असल्याचं मानलं जातं. कारण जेव्हा या राशिवाल्यांवर शनिदेवाची कृपा असते, तेव्हा त्यांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात सुख आणि आनंद निर्माण होतो. ही राशी असलेले लोक प्रेम आणि सेक्स लाईफच्या बाबतीत फार सजग असल्याचं मानलं जातं.

वृश्चिक : ही राशि असलेले लोक सेक्स आणि प्रेमाच्या बाबतील फार परिपक्व असल्याचं मानलं जातं. ही राशि असलेले लोक आपल्या नात्यात आणि रिलेशनशिपमध्ये पार्टनरची अधिक काळजी घेत असतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग