Side Effects of Eating Too Much Cauliflower: फ्लावर किंवा फुलकोबी विविध प्रकारे तयार करून खाता येते. हिवाळा सुरु झाला की फ्लावर खायचे प्रमाणही वाढते. अगदी पावभाजी पासून मटर फ्लावर, कोबी पराठा, फ्लावरचे पकोडे असे कितीतरी प्रकारे फ्लावरचे सेवन केले जाते. फुलकोबीची भाजी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे कारण ती टेस्टी असते. फ्लावर हे पोषणाचे पॉवर हाऊस मानले जाते. फुलकोबीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, फोलेट, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि मॅंगनीज सारख्या अनेक पोषक तत्वांसह अँटी- ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात. हे आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. असे असूनही काही लोकांनी फ्लावरचे सेवन सावधगिरीने करण्याचा सल्ला दिला जातो. या ५ समस्या असलेल्या लोकांनी जास्त प्रमाणात फ्लावर खाऊ नये.
फुलकोबीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्याने पचनसंस्थेवर दबाव येतो. त्यामुळे व्यक्तीला पोट फुगणे, गॅस आणि जुलाबाची समस्या होऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला आधीच पचनाची समस्या असेल तर फुलकोबीचे सेवन मर्यादित प्रमाणात किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच करा. फुलकोबीमध्ये असलेले काही संयुगे पाचक एन्झाईम्स प्रतिबंधित करू शकतात. ज्यामुळे शरीराला काही पोषक तत्वांना तोडणे कठीण होते. यामुळे पोषक तत्वांचे शोषण बिघडू शकते आणि व्यक्तीला पचनाचा त्रास होऊ शकतो.
फ्लावरचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने यूरिक अॅसिडची समस्या वाढू शकते. कारण फुलकोबीमधील प्युरीन नावाचे संयुग रक्तातील यूरिक अॅसिडची पातळी वाढवू शकते. त्यामुळे सांध्यांमध्ये दुखणे आणि सूज येणे यासारख्या समस्या व्यक्तीला अधिक त्रास देऊ शकतात.
फ्लावरमध्ये असलेले गोइट्रोजेन्स हे नैसर्गिकरित्या उद्भवणारे घटक आहेत जे थायरॉईडचे कार्य बिघडू शकतात. फुलकोबीचे जास्त सेवन केल्याने थायरॉईड हार्मोनवर मर्यादा येऊ शकतात.
फ्लावरमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, जे किडनी स्टोनसाठी जबाबदार मानले जाते. तुम्हाला आधीच किडनी स्टोनची समस्या असेल तर फुलकोबीचे सेवन केल्याने तुमचा त्रास आणखी वाढू शकतो.
फुलकोबीमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असल्यामुळे व्यक्तीचे रक्त हळूहळू घट्ट होऊ लागते. जे लोक आधीच रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच फुलकोबीचे सेवन करावे.
फ्लॉवर चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने पोटात गॅस आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात. जर तुम्हाला पचनाची समस्या असेल तर नेहमी शिजवलेली फुलकोबी खा. फ्लावरमध्ये अळ्या असल्यामुळे अनेक लोक ते उकळून खातात. पण फुलकोबी खाण्याची ही पद्धत योग्य मानली जात नाही. फुलकोबी उकळल्याने त्यातील अँटीऑक्सिडंट्स जवळजवळ नष्ट होतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)