Mocktails: वर्षाचा शेवटचा दिवस नक्कीच भारी पद्धतीने साजरा केला जात आहे, जोरदार रात्री पार्टी होत आहे. तुम्ही फूड मेन्यू ठरवला आहे पण ड्रिंक्ससाठी काय सर्व्ह करावे हे अजून ठरवता आलेले नसेल तर आम्ही मदत करतोय. आम्ही तुमच्यासाठी काही उत्कृष्ट मॉकटेल्स घेऊन आलो आहोत. मॉकटेलशिवाय कोणतीही पार्टी अपूर्ण आहे. या उत्कृष्ट मॉकटेल्सचा समावेश करून तुम्ही पार्टीला अधिक सुंदर बनवू शकता. चला जाणून घेऊयात घरी मॉकटेल कसे बनवायचे ते सोप्या पद्धतीने.
व्हर्जिन मोजितो हे प्रसिद्ध पेय आहे. ज्यांना अल्कोहोल नको आहे त्यांच्यासाठी नॉन-अल्कोहोल मोजिटो हा एक योग्य पर्याय आहे. यासाठी सर्व प्रथम, अर्धा स्प्राइट ग्लासमध्ये घाला. आता त्यात २ चमचे व्हर्जिन मोजिटो घाला. तुमचा व्हर्जिन मोजिटो तयार आहे.
ऑरेंज मॉकटेल बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात २ कप संत्र्याचा रस, थोडा लिंबाचा रस, १/४ कप पाणी आणि २-३ चमचे साखर मिसळा. साखर चांगली विरघळली की त्यात थोडा क्लब सोडा, काही पुदिन्याची पाने आणि काही बर्फाचे तुकडे घाला. यानंतर, हे स्वादिष्ट मॉकटेल ग्लासमध्ये घाला, नंतर काही पुदिन्याच्या पानांनी सजवा आणि पाहुण्यांना सर्व्ह करा.
हार्ड ड्रिंक्स टाळणाऱ्यांचे हे सर्वात आवडते आणि लोकप्रिय कॉकटेल असल्याचे म्हटले जाते. सर्वप्रथम अननसाचे तुकडे, थोडी साखर, थोडी नारळाची मलई, पांढरी रम, बर्फ आणि अननसाचा ताजा रस ब्लेंडरमध्ये एकत्र करून घ्या. हे सर्व मिश्रण कॉकटेल ग्लासमध्ये घाला आणि सजावट करण्यासाठी अननसाचा तुकडा घाला. तुमचा अननस कोलाडा तयार आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)