Parsi New Year 2024: तुम्ही कधी खाल्लीय का पारसींची फेमस स्वीट डिश 'रावो'? फारच सोपी आहे रेसिपी-parsi new year 2024 easy recipe to make ravo a traditional parsi sweet dish ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Parsi New Year 2024: तुम्ही कधी खाल्लीय का पारसींची फेमस स्वीट डिश 'रावो'? फारच सोपी आहे रेसिपी

Parsi New Year 2024: तुम्ही कधी खाल्लीय का पारसींची फेमस स्वीट डिश 'रावो'? फारच सोपी आहे रेसिपी

Aug 16, 2024 09:55 AM IST

Parsi Sweet Dish Ravo: आपला कोणताच सण गोड पदार्थांशिवाय पूर्णच होत नाही. रावोदेखील अशीच एक डिश आहे. जी पारसी समाजाची पारंपारिक डिश आहे.

'नवरोज' अर्थातच पारसी न्यू इयर
'नवरोज' अर्थातच पारसी न्यू इयर

Happy Parsi New Year 2024: आज पारसी बांधव 'नवरोज' अर्थातच पारसी न्यू इयर साजरा करत आहेत. पारसींसाठी आजचा दिवस अत्यंत खास असतो. आनंदाने उत्साहाने आपल्या नव्या वर्षाची सुरुवात करतात. भारतीयांसाठी सण आणि सामाजिक कार्यक्रम म्हणजे प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधीच होय. यामध्ये नृत्य, गाणे, गप्पा मारणे आणि भरपूर खानपान करणे या गोष्टी आपसूकच येतात. याप्रसंगी गोड, मसालेदार, कुरकुरीत आणि मसालेदार अशा सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. शिवाय आपला कोणताच सण गोड पदार्थांशिवाय पूर्णच होत नाही. रावोदेखील अशीच एक डिश आहे. जी पारसी समाजाची पारंपारिक डिश आहे. आज आपण या गोड पदार्थाची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.

रव्यापासून बनलेल्या या स्वीट डिशमध्ये सुका मेवा देखील वापरला जातो. ज्यामुळे ही डिश अधिक पौष्टिक बनते. ड्रायफ्रुट्स आणि दुधापासून बनवलेली ही डिश सर्वांनाच आवडते. परंतु ज्यांना वाटते की, ही खूप गोड असल्याने यामध्ये जास्त कॅलरी असू शकतात. तर कॅलरीज कमी करण्यासाठी, या पदार्थात दूध आणि पाण्यासोबत गुळाचा वापर केला जातो. तुम्ही ते आनंदाने खाऊ शकता. पण डाएटवर असाल तर थोड्याशा प्रमाणात खाणे योग्य असते. पाहूया रेसिपी.

 

साहित्य-

-१ कप रवा

 

- १ कप तयार गूळ पावडर

 

-२ चमचे तूप

 

- ३ वेलची

 

-अर्धा टीस्पून जायफळ पावडर

 

-१ कप पाणी

 

-१ कप दूध

 

-अर्धा कप पिस्ता आणि बदाम (बारीक चिरलेले)

 

-२ चमचे चारोळे

 

-२ चमचे मनुका

 

-२ चमचे काजू (चिरलेले)

 

रावो बनवण्याची पद्धत-

रावो बनवण्यासाठी सर्वप्रथम रवा तूप किंवा तेल न घालता ५ मिनिटे भाजून घ्या. नंतर चारोळे आणि मनुके एका कढईत थोडे तुप घालून तळून घ्या आणि नंतर बाजूला ठेवा.आता एका कढईत थोडं तूप गरम करा. आता त्यात भाजलेला रवा घाला. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पुन्हा भाजा.त्यांनंतर आता त्यात गरम पाणी घाला. मग नंतर दूध घाला आणि झाकून ठेवा आणि थोडा वेळ शिजू द्या. थोडे शिजत आल्यानंतर त्यात गूळ पावडर घालून चांगले मिक्स करा. आता तयार रावो चारोळी, मनुका आणि ड्रायफ्रुट्सने सजवा. आता तुम्ही गरम गरम सर्व्ह करा.

विभाग