Olympics 2024: काही तासांत कमी होऊ शकतं वजन? ऑलिम्पिकमध्ये खेळाडू नेमकं काय करतात?-paris olympics 2024 vinesh phogat disqualified how olympic athletes lose weight in hours ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Olympics 2024: काही तासांत कमी होऊ शकतं वजन? ऑलिम्पिकमध्ये खेळाडू नेमकं काय करतात?

Olympics 2024: काही तासांत कमी होऊ शकतं वजन? ऑलिम्पिकमध्ये खेळाडू नेमकं काय करतात?

Aug 09, 2024 12:54 PM IST

Is It Possible To Lose Weight In Short Time: खरंच असा काही व्यायाम आहे का ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होईल? असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत आहे.

Paris Olympics 2024
Paris Olympics 2024

Paris Olympics 2024:  ऑलिम्पिक स्पर्धेची रणधुमाळी सुरु आहे. यंदाची ऑलम्पिक स्पर्धा पॅरिसमध्ये पार पडत आहे. यामध्ये भारतासह जगभरातील खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत. भारताची लेक विनेश फोगाटनेसुद्धा उत्तम कामगिरी करत सर्वांचंच प्रेम मिळवलं आहे. परंतु दुर्दैवाने उपांत्य फेरीत तिला खेळातून बाहेर पडावं लागलं. विनेश फोगट ५० किलो वजनी गटातून लढत होती. मात्र तिचे वजन केवळ १०० ग्रॅमने वाढल्याने तिला अंतिम फेरीतून अपात्र घोषित करण्यात आले. त्यामुळे वजनाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. वास्तविक, खेळाडूंसाठी वजनाचे नियम बरेच वेगळे असतात. पण खरंच असा काही व्यायाम आहे का ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होईल? असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत आहे. वास्तविक, विनेश फोगटच्या आधी बॉक्सर मेरी कोमही अशाच परिस्थितीत अडकली होती. तिलासुद्धा वाढलेल्या वजनामुळे अपात्रतेची भीती निर्माण झाली होती. पण तिने आपले वजन आटोक्यात आणले होते. परंतु सामान्य लोक त्यांचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी या व्यायामाची मदत घेऊ शकतात का? आणि खरंच अशाने लगेच वजन कमी होतं का? याबाबतच आपण जाणून घेऊया.

मेरी कोमने काही तासांत वजन कसे कमी केले?-

रिपोर्ट्सनुसार, २०२१ मध्ये पोलंडमधील सिलेशियन ओपन बॉक्सिंग स्पर्धेत नियमित वजन तपासणी दरम्यान, मेरी कोमचे वजन ४८ किलोपेक्षा जास्त होते. आणि त्यामुळे तिला तिच्या अपात्रतेची भीती निर्माण झाली होती. पण मेरी कोमने पटकन आपले वाढलेले वजन कमी करत ते नियंत्रित केले. मेरी कोमने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तिने जवळपास तासभर दोरी उड्या मारून आपले वजन नियंत्रित केले होते.

उच्च तीव्रतेच्या व्यायामामुळे वजन कमी होईल-

काही काळ जलद व्यायाम केल्याने शरीराची जलद हालचाल होते. आणि अशाने वजन झपाट्याने कमी होते. उच्च तीव्रतेचा व्यायाम पचनक्रिया वाढवण्यास आणि कमी वेळेत अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करतो. परंतु हा व्यायाम तज्ज्ञांच्या सल्ल्याने केला जातो. त्याचे काही खास नियम असतात.

दोरी उड्या मारल्याने वजन झपाट्याने कमी होते का?

दोरी उड्या मारणे हा देखील असाच एक व्यायाम आहे, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होते. दोरी उड्या हा हाय इंटेन्सिटी वर्कआउट्समध्ये समाविष्ट होतो. दोरीने उडी मारण्याच्या एका मिनिटात १० ते २० कॅलरीज बर्न होतात. अशा प्रकारे तुम्ही वजन झपाट्याने कमी करू शकता. याशिवाय, दोरीवर उडी मारणे हा एक व्यायाम आहे ज्यासाठी जास्त उपकरणे आणि जागेची आवश्यकता नसते.फक्त एका दोरीच्या मदतीने तुम्ही सहज वजन कमी करू शकता. तसेच तुमचे स्नायू मजबूत, हृदय आणि फुफ्फुसे मजबूत करू शकता. यासोबतच पाय, हात आणि मेंदूलाही बळ मिळते. दोरीने उड्या मारल्याने मन आणि शरीर यांच्यात परिपूर्ण संतुलन राखण्यात मदत होते. त्यामुळे दोरीवर उडी मारणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)