मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Responsible Kids: पालकांनी केलेल्या या गोष्टी बनवतात मुलांना जबाबदार, अजिबात चुकवू नका

Responsible Kids: पालकांनी केलेल्या या गोष्टी बनवतात मुलांना जबाबदार, अजिबात चुकवू नका

Jan 19, 2024 11:38 PM IST

Parenting Tips: प्रत्येक आई वडिल आपल्या मुलांवर चांगले संस्कार करतात. पालकांच्या अनेक गोष्टींवरून मुलं शिकत असतात. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मुलांना जबाबदार बनवतात.

पॅरेंटिंग टिप्स
पॅरेंटिंग टिप्स

Things to Make Kids More Responsible: प्रत्येक पालकाला वाटत असते की त्यांच्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे. त्यांनी जीवनात एक जबाबदार आणि यशस्वी व्यक्ती व्हावे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. पण सर्वच पालकांचे हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. मुलं फक्त पालकांनी सांगितलेल्या गोष्टी शिकत नाही तर पालकांच्या वागणूकीतून शिकत असता. कधी कधी पालकांच्या हातून कळत नकळत काही चुका घडतात ज्यामुळे मुल जबाबदारी घेण्यास टाळतात. पालकांनी केलेल्या या गोष्टींमुळे मुलं जबाबदार बनवतात. या कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घ्या.

मुलांसोबत आपल्या समस्या शेअर करा

मुलांसोबत तुमच्या समस्या शेअर केल्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या आयुष्याशी संबंधित सर्व समस्या त्यांच्यासोबत शेअर कराव्या. अशा गोष्टी मुलांसोबत शेअर करा ज्यामुळे ते तुमची थोडीफार मदत करतील आणि मुलंही जबाबदारी घ्यायला शिकतील. मुलांसोबत अशी कोणतीही गोष्ट शेअर करू नका, ज्याचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होईल.

ट्रेंडिंग न्यूज

पर्याय देणे आवश्यक

घरातील लहान मोठ्या निर्णयांमध्ये तुमच्या मुलाला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करा. तसेच त्यांच्याद्वारे दिल्या गेलेल्या पर्याय आणि सूचनांचा विचार करा. उदा. सुट्टी मध्ये कुठे फिरायला जाऊ शकतो, यावर मुलांचे मत विचारात घ्या. या सर्व गोष्टींमुळे मुलामध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते.

 

विश्वास ठेवा

आपल्या मुलाला योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगण्यासाठी तुमचं त्याच्यावर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुमचा मुलगा तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या घराची काळजी घेऊ शकतो असा विश्वास तुम्हाला निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला तसे करण्याची संधी द्या. तुमचा विश्वास मुलाला जबाबदार बनवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून काम करेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel