Parenting Tips: तुमच्याही मुलांना अभ्यासच लक्षात राहात नाही? 'या' सोप्या टिप्सने वाढवा मुलांची स्मरणशक्ती
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Parenting Tips: तुमच्याही मुलांना अभ्यासच लक्षात राहात नाही? 'या' सोप्या टिप्सने वाढवा मुलांची स्मरणशक्ती

Parenting Tips: तुमच्याही मुलांना अभ्यासच लक्षात राहात नाही? 'या' सोप्या टिप्सने वाढवा मुलांची स्मरणशक्ती

Jul 25, 2024 10:01 AM IST

Tips to improve children's memory: अनेक शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात मन लागत नाही. किंवा सतत अभ्यास करूनही त्यांना लक्षात काहीच राहात नाही. अशावेळी तुमच्या मुलांना स्मरणशक्तीसंबंधी समस्या असू शकते.

मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी  टिप्स
मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी टिप्स

बदलत्या काळानुसार शिक्षणाच्या पद्धतीदेखील बदलत आहेत. सध्या लहान मुलांवर अभ्यासाचा अतिरिक्त भार असल्याचं दिसून येतं. शिवाय शैक्षणिक बाबतीत पालकांना मुलांकडून भरमसाठ अपेक्षा असतात. त्यामुळे मुलांवरील ताण आणखी वाढतो. अशावेळी मुलांची मानसिक स्थिती बिघडते. किंवा ते शैक्षणिक प्रवाहापासून बाहेर पडतात. त्यामुळे शकतो पालकांनी आपल्या मुलांच्या शैक्षणिक बाबींमध्ये योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. अनेक शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात मन लागत नाही. किंवा सतत अभ्यास करूनही त्यांना लक्षात काहीच राहात नाही. अशावेळी तुमच्या मुलांना स्मरणशक्तीसंबंधी समस्या असू शकते. आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.

बहुतांश पालक आपल्या मुलांना सतत अभ्यास करण्याचा सल्ला देतात. त्यानुसार मुले अभ्यासही करतात. मात्र त्यांना काहीच लक्षात राहत नाही. अशावेळी पालक त्यांना ओरडण्याचा किंवा भिती दाखविण्याचाही प्रयत्न करतात. मात्र मुलांना ओरडण्याऐवजी काही सोप्या टिप्स तुम्ही अवलंबलात तर तुमच्या मुलांची मानसिक स्थितीही उत्तम राहील. आणि त्यांची स्मरणशक्तीसुद्धा सुधारण्यास बरीच मदत होईल.

काही तज्ज्ञांच्या रिपोर्ट्सनुसार, तुम्ही राहात असलेल्या ठिकाणाचा, तेथील वातावरणाचा, तुमच्या खानपानाचासुद्धा परिणाम तुमच्या मुलांच्या स्मरणशक्तीवर होऊ शकतो. त्यामुळे मुलांना सतत रागावण्यापेक्षा, चिडचिड करण्यापेक्षा काही लहान-लहान गोष्टींमध्ये बदल केल्यास तुमच्या मुलांच्या स्मरणशक्तीत प्रचंड वाढ होईल. शिवाय त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. त्यामुळेच पुढे दिलेल्या काही टिप्सचा अवलंब केल्यास तुमच्या मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो. स्मरणशक्ती सुधारल्याने तुमच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीतही सकारात्मक बदल पाहायला मिळेल.

मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा हे उपाय

१)मुलांनां प्रश्न विचारू द्या-

बहुतांश सर्वच लहान मुले सतत प्रश्न विचारत असतात. या मुलांना आपल्या डोळ्यासमोर दिसणाऱ्या अथवा घडणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींचे कुतूहल असते. त्यांना त्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. आणि म्हणूनच त्यांच्या मनात अनेक प्रश्न घोळत असतात. अशावेळी मुले आपल्या पालकांना सतत प्रश्न विचारून भांडावून सोडतात. काही पालक आपल्या मुलांच्या या सवयींना योग्यरीत्या हाताळतात. मात्र काही पालक मुलाच्या सतत प्रश्न विचारण्याची त्रासून जातात. आणि त्यांना प्रश्न विचारण्यास मनाई करतात. किंवा काहीही कारणे देऊन त्यांचे लक्ष त्या गोष्टीवरून काढून टाकतात. मात्र असे न करता मुलांना प्रश्न विचारण्याची मोकळीक द्या. असे केल्याने त्यांची वैचारिक, बौद्धिक क्षमता वाढते. त्यांना विविध विषयांबाबत माहिती होते. शिवाय त्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबतात आणि त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

म्युझिक रिकॉल

बऱ्याचवेळा वाचन, पाठांतर मुलांना कंटाळवाणे वाटते. त्यामुळे आपल्या मुलांची उत्सुकता वाढवण्यासाठी त्यांना कोणतीही गोष्ट कवितेच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न करा. अशाप्रकारे तुमची मुले उत्साही होतात आणि त्या कवितेच्या लयमुळे त्यांना पटकन लक्षातही राहते.

उत्सुकता वाढवणे

मुलांना सतत पुस्तक वाचून कंटाळा येतो. त्यामुळे त्यांना शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित ठिकाणे, म्युझियम, प्राणी संग्रहालय अशा ठिकाणी भेट द्यावी. जेणेकरून त्यांची उत्सुकता वाढते. आणि प्रत्यक्षात या गोष्टी अनुभवल्यामुळे त्यांना पटकन लक्षातही राहते.

संतुलित आहार आणि झोप

मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आहारसुद्धा महत्वाचा घटक असतो. त्यामुळेच आपल्या मुलांच्या भोजनात बदाम, आक्रोड, दूध, हिरव्या पालेभाज्या, मासे, ब्रोकली, फळे अशा सकस पदार्थांचा समावेश करावा. शिवाय मुलांना पुरेशी झोप मिळाल्याने त्यांचे शारीरिक आणि बौद्धिक स्वास्थ्य उत्तम राहते.

रिव्हिजन करणे फायदेशीर

मुलांनी केलेला अभ्यासाचे दररोज रिव्हिजन घेणे आवश्यक असते. असे केल्याने त्यांना ते विसर पडणे शक्य नसते. शिवाय फक्त पाठांतर ने घेता समजावून शिकवणे आणि अभ्यास करून घेणे योग्य असते.

Whats_app_banner