Parenting Tips: आरशासमोर बसून अभ्यास केल्याने होतात अनेक फायदे! मुलांना हुशार बनवायचंय तर ‘हे’ नक्की करा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Parenting Tips: आरशासमोर बसून अभ्यास केल्याने होतात अनेक फायदे! मुलांना हुशार बनवायचंय तर ‘हे’ नक्की करा

Parenting Tips: आरशासमोर बसून अभ्यास केल्याने होतात अनेक फायदे! मुलांना हुशार बनवायचंय तर ‘हे’ नक्की करा

Published Oct 08, 2024 12:11 PM IST

Smart Parenting Tips For Child Education: मुलांची स्मरणशक्ती वाढवण्याच्या अनेक टिप्स तुम्ही ऐकल्या असतील. पण, आज आम्ही तुम्हाला अभ्यासाची एक पद्धत सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या मुलांना अभ्यासात खूप फायदा होऊ शकतो.

Studying sitting in front of the mirror
Studying sitting in front of the mirror

Smart Parenting Tips: आपल्या मुलाने शिक्षणात चांगली प्रगती करावी, असे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. मात्र, काही मुले अभ्यासात सतत मागे पडतात. अशावेळी मुलांची चूक नक्कीच असू शकते. पण, याला दुसरी बाजू देखील आहे, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. मुलांना अभ्यास करायचा असतो, पण काही कारणास्तव त्यांना वाचलेल्या गोष्टी नीट आठवत नाही, असे होऊ शकते. आता मुलांची स्मरणशक्ती वाढवण्याच्या अनेक टिप्स तुम्ही ऐकल्या असतील. पण, आज आम्ही तुम्हाला अभ्यासाची एक पद्धत सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या मुलांना अभ्यासात खूप फायदा होऊ शकतो. आरशासमोर बसून मुलं अधिक प्रभावीपणे अभ्यास करू शकतात, असा दावा अनेक संशोधनांनी केला आहे. चला तर मग जाणून घेऊया अभ्यासाच्या या सवयीशी संबंधित काही फायदे...

मुलांना मिळते स्वयंप्रेरणा!

झोप न येत बराच वेळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे, हे तसे अवघड काम आहे. यासाठी स्वत:ला सतत प्रेरित ठेवण्याची गरज आहे. या कामात आरसा मुलांना मदत करू शकतो. यासाठी त्यांच्या अभ्यासाच्या टेबलासमोर, तो आपला चेहरा पाहू शकेल अशा प्रकारे आरसा लावा. यामुळे, जेव्हा मूल स्वत:ला अभ्यास करताना बघेल, तेव्हा त्यांना आतून आत्म-प्रेरणा मिळेल. ही छोटी ट्रिक मुलांना मानसिकरित्या प्रेरित आणि सक्रिय करण्यास मदत करेल.

Parenting tips: तुमचीही मुलं अंथरुणात लघवी करतात? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुलांचा आत्मविश्वास वाढतो!

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, काही मुलांना लोकांसमोर बोलायला संकोच वाटतो. अशावेळी अनेकदा आरशासमोर उभं राहून बोलण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आपोआप आत्मविश्वास वाढू लागतो. हे ट्रिक अनेकांच्या कमी आली आहे. अभ्यासाच्या बाबतीतही ही ट्रिक लागू होते. आरशासमोर बसून अभ्यास केल्याने, मूल स्वतःला आरशात पाहते आणि लोकांसमोर स्वतःला कसे सादर करायचे ते शिकते. यामुळे त्यांचा अभ्यास तर सुधारतोच, शिवाय व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वासही वाढतो.

गोष्टी लक्षात ठेवण्यास होते मदत!

'आमचा मुलगा खूप अभ्यास करतो, पण तो लगेच सगळं विसरून जातो', अशी अनेक पालकांची तक्रार असते.  तुमचीही अशीच तक्रार आहे का? तसे, असेल तुम्हीही ‘मिरर ट्रिक’चा अवलंब करू शकता. आरशात स्वत:ला पाहताना मुले काही बोलतात किंवा आठवतात, तेव्हा ही दृश्य स्मृती त्यांच्या मनावर मोठ्या प्रमाणात अंकित होतात. अशा परिस्थितीत, जेव्हा ते नंतर वाचलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना सहजपणे गोष्टी आठवतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner