Parenting Tips By Vikas Divyakirti: पालकांना मुलांना उत्तम शिक्षण द्यायचे असते. यासोबतच त्यांना त्याचे आउटकम सुद्धा हवे असते. म्हणजे जणू मूलाने फक्त चांगल्या शाळेत फक्त शिकू नये तर नेहमीच टॉपला असावे. त्याचे मार्क जास्तीत जास्त यायला हवेत. मुलांचे मार्क ९८ टक्क्यांवरून ९७ टक्क्यांवर आले तर पालक खूप दु:खी आणि अस्वस्थ होतात. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलावर खूप दबाव ही देता की, त्याला अधिकाधिक चांगले मार्क मिळाले पाहिजे, पहिला नंबरच आला पाहिजे. विकास दिव्यकीर्तीने अशा पालकांना खूप चांगला सल्ला दिला आहे.
विकास दिव्यकीर्तीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात ते आपले विचार व्यक्त करताना दिसतात. पॅरेंटिंगबाबत विकास दिव्यकीर्ती म्हणतात की, मुलांना जास्त सक्षम बनवण्याच्या मागे धावू नका, हे पालकांनी समजून घेतले पाहिजे.
विकास दिव्यकीर्ती सांगतात की, जर तुमचं मूल अभ्यासात कमकुवत असेल आणि त्याला जास्त गुण मिळत नसतील तर इतर पालकांच्या दबावाखाली मुलाला अभ्यास करायला सांगता येणार नाही. जर एखाद्या मुलाला ९८ टक्के गुण मिळाले असतील तर आपल्या मुलाचे ५८ टक्के गुण मिळाल्याचे आनंदाने सांगा आणि आनंदी व्हा. तसेच मुलाला अभ्यासासाठी दबाव देऊ नका.
आपल्या मुलाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. मुले अनेकदा अपेक्षांमुळे दबावाखाली येतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या क्षमतेवर होतो. मुलं मोठी झाल्यावर आपोआप सक्षम होतील आणि नक्कीच काहीतरी करतील. त्यामुळे मुलांवर जास्त अपेक्षा ठेवू नका.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या