मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Good Parents: चांगले पालक असल्याचे सांगतात या गोष्टी, तुम्ही आहात का?

Good Parents: चांगले पालक असल्याचे सांगतात या गोष्टी, तुम्ही आहात का?

Jan 31, 2024 11:12 PM IST

Parenting Tips: मुलांचे संगोपन करताना अनेक वेळा पालकांकडून कळत नकळत काही चुका होत असतात. काही गोष्टी अशा आहेत, ज्या तुम्ही चांगले पालक असल्याचे सांगतात. कोणते ते जाणून घ्या.

चांगले पालक असल्याचे चिन्ह
चांगले पालक असल्याचे चिन्ह (unsplash)

Good Parenting Skills: खरं तर कोणतीच व्यक्ती परिपूर्ण नसते. तसेच एखादे पालक चांगले किंवा वाईट असे ठरवता येत नाही. कारण प्रत्येकच पालक आपल्या मुलांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करतात. प्रत्येकाला आपली मूलं चांगली घडावी असे वाटत असते. प्रत्येक मुलासाठी वेगवेगळ्या प्रकारची पॅरेंटिंग कार्य करते. त्यामुळे कोणत्याही एका प्रकारचा पॅटर्न फॉलो करणे अवघड आहे. त्याच बरोबर पालकांवरही आपल्या मुलाच्या संगोपनासाठी समाज आणि कुटुंबाचा दबाव असतो. स्वतःला चांगल्या पालकांचा टॅग मिळवण्यासाठी काही लोक मुलांसोबत जास्त कडक, कठोर वागतात. जर तुमच्या मुलामध्येही काही गोष्टी, क्वालिटी असतील तर ते दर्शवते की तुम्ही एक चांगले पालक आहात.

मूल शेअर करतात समस्या

प्रत्येक पालकांला वाटत असते की मुलांनी त्यांना प्रत्येक गोष्ट सांगावी, सर्व शेअर करावे. फक्त चांगल्या गोष्टीच नाही तर मुलांनी त्यांच्या समस्या सुद्धा पालकांशी शेअर केल्या तर पालकांना चांगले वाटते. जर तुम्ही तुमच्या मुलाला समजून घेऊन त्याच्या सर्व समस्या ऐकून त्याला पाठिंबा दिला तर मूल मोकळेपणाने तुमच्याशी बोलू शकेल. याचा अर्थ असा आहे की तुमचे पॅरेंटिंग (parenting) खूप चांगले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मार्क्स म्हणजे सर्व काही नाही

बरेच पालक फक्त मुलांना किती मार्क मिळाले याचा दबाव टाकतात, असे तुम्ही पाहिले असेल. पण तुमच्या मुलाला कमी मार्क मिळाल्यावर तुम्ही समजावून सांगत असाल की नेहमी जास्त मार्क्स मिळणे गरजेचे नसते. त्यापेक्षा शाळेतील त्याची वागणूक आणि कौशल्येही महत्त्वाची आहेत. अशा परिस्थितीत मुले कमी मार्क्स आल्यावर पालकांपासून लपवत नाहीत. तुम्ही चांगले पालक असल्याचे हे चिन्ह आहे.

मुलांप्रमाणेच पालकांनाही असावे नियम

मुलं कोणतीही गोष्ट अनुकरणातून लवकर शिकतात. मुलांना कोणताही नियम शिकवण्यापूर्वी तो स्वतःला लागू करणे सर्वात महत्त्वाचे आहे. जर तुम्ही हे केले तर ते सर्वोत्तम पालक आहेत.

पालकांनीही मान्य करावी चूक

चूक कोणाचीही असो ती मान्य केली पाहिजे. मुलांना हे शिकवण्यासाठी आधी पालकांनी सुद्धा आपली चूक मान्य केली पाहिजे. पालक आहात म्हणून तुम्ही नेहमी बरोबर असालच असे नाही. मुलांसमोर आपली चूक मान्य केली पाहिजे.

 

मुलावर विश्वास ठेवणे आवश्यक

अनेक वेळा पालक आपल्या मुलांवर विश्वास ठेवत नाही आणि कोणी काही सांगितले तर लगेच मुलांना रागावायला मारायला लागतात. असे करू नका. आधी आपल्या मुलांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यासोबत प्रेमाने बोला. त्यांना शांतपणे नेमकं काय झाले हे विचारा. प्रकरण मुलांच्या दृष्टिकोनातून समजून घ्य. मुलांवर विश्वास दाखवल्याने मुलं सुद्धा खोटं न बोलता खरं शेअर करतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel