Parenting Tips: तुमचीही मुलं अभ्यास करण्यास कटकट करतात? 'या' टिप्स करा फॉलो, आनंदाने करतील होमवर्क
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Parenting Tips: तुमचीही मुलं अभ्यास करण्यास कटकट करतात? 'या' टिप्स करा फॉलो, आनंदाने करतील होमवर्क

Parenting Tips: तुमचीही मुलं अभ्यास करण्यास कटकट करतात? 'या' टिप्स करा फॉलो, आनंदाने करतील होमवर्क

Published Jul 31, 2024 02:28 PM IST

Tips to motivate kid to finish school homework: मुले सतत गृहपाठ करण्यास टाळाटाळ करताना दिसतात. मुलांची ही समस्या कोणत्याही एका पालकाची नसून आजच्या काळात बहुतांश पालक या समस्येने त्रस्त आहेत.

Tips to motivate kid to finish school homework: मुलांमध्ये गृहपाठाची आवड निर्माण करतील अशा  टिप्स
Tips to motivate kid to finish school homework: मुलांमध्ये गृहपाठाची आवड निर्माण करतील अशा टिप्स (shutterstock)

Tips to motivate kid to finish school homework: बहुतांश वेळा मुलांना अभ्यासापेक्षा जास्त रस खेळण्यात असतो. त्यामुळेच तुम्ही त्यांना जितकं खेळायला वेळ द्याल तितका त्यांना हवाच असतो. याउलट अभ्यासाच्या बाबतीत घडतं. अनेक मुले अभ्यास करण्यास सतत कटकट करत असतात. दिवसभर पेन्सिल-इरेजर आणि मोबाइलसोबत खेळल्यानंतर त्यांना गृहपाठ विचारला जातो तेव्हा ते करण्यास टाळाटाळ करताना दिसतात. मुलांची ही समस्या कोणत्याही एका पालकाची नसून आजच्या काळात बहुतांश पालक या समस्येने त्रस्त आहेत. 

लॉकडाऊनपासून मुलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येत आहे. हल्लीची मुलं लिहायला टाळाटाळ करतात. जर तुमचं मुलही शाळेचा होमवर्क करण्यास टाळाटाळ करत असेल किंवा रोज एक नवं कारण देत असेल तर त्याचा कंटाळवाणा होमवर्क मजेदार आणि इंटरेस्टिंग करण्यासाठी या टिप्स फॉलो करा. या टिप्सचा अवलंब केल्यानंतर तुमचे मुल शाळेतून घरी येताच सर्वप्रथम होमवर्क पूर्ण करेल.

 

मुलांमध्ये गृहपाठाची आवड निर्माण करतील या टिप्स

- मुलांना गृहपाठ करण्यासाठी शांत जागा द्या.

- मुलांसाठी लहान-लहान ध्येये निश्चित करा. कारण सुरुवातीलाच खूप प्रेशर दिल्यास ते घाबरून जातील.

-मुलांना भरपूर गृहपाठ मिळाला असेल तर त्याचे छोटे-छोटे टप्पे करा. जेणेकरून त्यांना कंटाळा येणार नाही.

-तुमच्या मुलाने गृहपाठ करताना चूक केली तर आरडाओरड करण्याऐवजी त्याची चूक सुधारा आणि त्याला लिहिण्यास प्रोत्साहित करा.

-तुमच्या मुलासोबत संयम ठेवा आणि त्याला त्याचा गृहपाठ पूर्ण करण्यात मदत करा. असे केल्याबद्दल त्यांना बक्षीससुद्धा द्या.

- प्रत्येक मूल वेगळे असते. काही मुलांना इतरांपेक्षा जास्त प्रेरणा आणि समर्थनाची आवश्यकता असू शकते. अशा परिस्थितीत, मुलाला गृहपाठ करायला लावताना, प्रत्येक विषय मनोरंजक आणि आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करा.

-अभ्यासात सतत आपल्या मुलांची इतरांशी तुलना करून त्यांना रागावणे टाळा. जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास कमी होणार नाही.

-बऱ्याचवेळा गणित हा विषय मुलांना कंटाळवाणा वाटतो. अशात गणिताला मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही खाण्यापिण्याची वस्तूंची उदाहरणे देऊन मुलाला शिकण्यात मदत करू शकता. याशिवाय गणितातील समस्या सोडवण्यासाठी गमतीदार कोडी आणि ब्रेन टीझर वापरायला शिकवा.

-पालकांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, तुमचं मुल त्याचा गृहपाठ आनंदाने तेव्हाच करेल जेव्हा त्याला त्यात मजा येईल. पालकांनी आपल्या मुलाचा गृहपाठ पुस्तकीयऐवजी व्यावहारिक बनवला पाहिजे.कारण मुलांना व्यावहारिकरित्या गृहपाठ करण्यात आनंद होतो. शिवाय त्यांना त्या गोष्टी पटकन समजण्यास मदत होते.

Whats_app_banner