मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kids Problem: पालकांना समजत नाही मुलांच्या या समस्या, या कारणांमुळे निर्माण होतो दुरावा

Kids Problem: पालकांना समजत नाही मुलांच्या या समस्या, या कारणांमुळे निर्माण होतो दुरावा

Jan 25, 2024 12:20 AM IST

Parenting Tips: अनेकदा पालकांच्या काही चुकांमुळे मुलांच्या आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची भिंत उभी राहते. पालकांनी कोणत्या गोष्टी समजून घ्याव्या हे जाणून घ्या.

पॅरेंटिंग टिप्स
पॅरेंटिंग टिप्स (unsplash)

Kids Problem Parents Never Understand: आपल्यासोबत कोणी जसं वागलेलं आपल्याला आवडणार नाही तशा प्रकारची वागणून कोणाशी ठेवू नये असं म्हटलं जातं. पालकांबद्दल बोलताना ते अनेकदा आपल्या मुलांशी कसे वागले पाहिजे हे विसरतात. बऱ्याच बाबतीत पालक हे विसरतात. अनेक वेळा पालकांच्या काही चुकांमुळे पालक आणि मुलांमध्ये भिंत निर्माण होऊ लागते. पालकांनी काही गोष्टी समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. पालकांनी कोणत्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे याबद्दल जाणून घ्या.

जनरेशन गॅप

काळ खूप बदलला आहे हे पालकांनी समजून घ्यायला हवे आणि पिढीतील बदल स्वीकारणे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमची मते मुलावर लादली तर ते मूल तुमच्यापासून दूर जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

पुन्हा पुन्हा दाखवू नका चुका

कोणतेही नाते परिपूर्ण नसते हे पालकांना मान्य करावे लागेल. मुलांच्या चुका नेहमी नेहमी दाखवू नका.

प्रायव्हसी न देणे

मुलं जसजशी मोठी होतात तसतशी त्यांना काही प्रायव्हसीची गरज असते. पण अनेकदा पालकांना या गोष्टी समजत नाहीत. त्यामुळे ते सतत त्यांना टोकत राहतात. मुलांमध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक बदलही होतात हे समजून घेतले पाहिजे.

स्वतःचे मित्र निवडणे

अनेक पालकांना त्यांच्या मुलांवर नियंत्रण हवे असते. अनेक पालकांना त्यांच्या मुलांनी त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मित्र निवडावेत आणि त्यांनी सांगितलेल्या वेळीच त्यांच्या मित्रांशी बोलावे असे वाटते. पण पालकांना हे समजले पाहिजे की कुटुंबासोबतच त्यांच्यासाठी मित्र असणे देखील खूप महत्वाचे आहे. त्यांचे मित्र त्यांना निवडू दिले पाहिजे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel