Things To Do As A Father: मुलाच्या संगोपनात अनेक गोष्टींचा हातभार लागतो. ज्यामध्ये आईसोबतच वडील आणि घरातील वातावरणही महत्त्वाचे असते. केवळ आईच्या शिकवणीने मुले पूर्ण वाढू शकत नाहीत. वडील या नात्याने त्याचे संगोपन करताना तुम्हीही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तरच मुलाचा विकास होईल आणि तो प्रत्येक क्षेत्रात पुढे असेल आणि सर्वांचा आदरही करेल. आईसोबतच वडिलांनी देखील काही गोष्टी केल्या तर त्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि त्याचा मुलांच्या विकासावरही सकारात्मक परिणाम झालेला पहायला मिळतो. वडिल म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे हे जाणून घ्या.
मुलांसोबत पूर्णपणे इंगेज असणे आवश्यक आहे. विशेषतः जेव्हा आई काम करत असते. अशा वेळी मुलासोबत इंगेज राहणे, त्याला खायला घालणे, शिकवणे आणि त्याच्याशी बोलणे ही बाबांची जबाबदारी असते. जेणेकरून मुले फक्त आईकडेच जात नाहीत आणि वडिलांशी सुद्धा त्यांचे नाते वाढते. अशा घरातील वातावरणाचा परिणाम लहानपणापासूनच मुलावर होत असतो.
आपल्या मुलांसमोर आपल्या पत्नीला शिवीगाळ करणे किंवा तिचे बोलणे मध्येच कापणे आणि तिला चुकीचे म्हणणे कधीही योग्य नाही. या गोष्टींचा वाढत्या मुलाच्या मनावर विपरीत परिणाम होतो. मुलासमोर एकमेकांशी असहमत असल्याचे व्यक्त न करण्याचा प्रयत्न करा. तर ते खाजगीत सांगा आणि परस्पर तक्रारींचे निराकरण करा.
डिनर म्हणजेच रात्रीचे जेवण करण्यासाठी संपूर्ण कुटूंब एकत्र बसा. यावेळी मुलाशी बोला आणि त्याचे ऐका. लगेच प्रतिक्रिया देऊ नका आणि तिथेच लेक्चर देऊ नका. त्याऐवजी मुलाला सर्व काही शेअर करण्याची संधी द्या. याचा मुलावर सकारात्मक परिणाम होतो. तो आपल्या भावना शेअर करायला शिकतो, न डगमगता सर्वांसमोर बोलण्याची सवय विकसित करतो आणि त्याच्या वडिलांशी बंधही जोडतो.
पालकांनी मुलासमोर एकाच पद्धतीने बोलले पाहिजे. एकमेकांचे म्हणणे मध्येच कापल्याने मूल गोंधळून तर जातेच शिवाय त्याच्या मनावरही विपरीत परिणाम होतो.
बऱ्याच वेळा वडिला मुलांवर काहीही विचार न करता खर्च करतात. पण जर खर्च करण्यापूर्वी आईची संमती घेण्याची सवय जर मुलांना लावली तर त्यामुळे पैसे खर्च करण्यापूर्वी मूल नक्कीच विचार करेल आणि बजेट कसे नियंत्रित करावे हे समजेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या