Health Benefits of Papaya Seeds: पपईमध्ये अनेक पोषक तत्त्व असतात. पिकलेल्या पपई प्रमाणेच कच्ची पपई सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर असते. पपई खाल्ल्याने त्वचेला आणि आरोग्यालाही फायदा होतो. पपई खाताना त्यातील बिया सर्रास फेकून दिल्या जातात. पण या काळ्या बियांचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही त्यांना फेकून देण्याची चूक कधीच करणार नाही. पपई प्रमाणेच त्याच्या बिया देखील गुणांचे भांडार असून, ते औषधापेक्षा कमी नाही. विशेषत: महिलांसाठी पपईच्या बियांमध्ये आश्चर्यकारक फायदे लपलेले आहेत. चला तर मग जाणून घ्या पपईच्या बिया खाण्याचे फायदे आणि ते कसे खावे.
पपईच्या बियांमध्ये फायबर, प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. तसेच जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, फॉस्फरस समृध्द असलेल्या पपईमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असतात. या काळ्या-तपकिरी रंगाच्या बियांची चव तुरट असते. जे वाळवून त्याची बारीक पावडर करून खाल्ली जाते.
पपईच्या बिया खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल योग्य राहण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे मोनोसॅच्युरेटेड अॅसिड खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
पपईच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते, जे पचनास मदत करते. याचे सेवन केल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ सहज शरीरातून बाहेर पडतात. पपईच्या बिया चयापचय प्रणाली योग्य ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही.
पपईप्रमाणेच त्याच्या बिया खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते. आतड्यांमध्ये आढळणारे हानिकारक कीटक आणि बॅक्टेरिया नष्ट करते आणि योग्य मोशन क्रिया करण्यास मदत करते.
पपईच्या बियांमध्ये आढळणारे कॅरोटीन शरीरातील इस्ट्रोजन हार्मोन्स नियंत्रित करते. यासोबतच मासिक पाळी नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. या बिया खाल्ल्याने मासिक पाळीच्या दुखण्यामध्ये आराम मिळतो.
पपईच्या बिया खाल्ल्याने इंफ्लेमेशनमध्ये आराम मिळतो. तर कर्करोगाचा धोका कमी होतो. त्यात पॉलीफेनॉल अँटी ऑक्सिडंट असते. ज्यामुळे अनेक प्रकारच्या रिस्कचा धोका कमी होण्यास मदत होते.
पपईच्या बिया खाण्यासाठी या बिया उन्हात वाळवा. बिया कडक उन्हात वाळवण्याची खात्री करा. बिया वाळल्यानंतर बारीक पावडर करा. आता ही पावडर हवाबंद डब्यात ठेवा आणि रोज खा. ही
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)