What Was in Pankaja Munde's Purse: येत्या काळात विधानसभा निवडणूका होणार आहेत. याची जोरदार तयारी आता सुरु झाली आहे. नेतेमंडळी विविध भागात दौरे करत आहेत. यामध्ये पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि विधानसभा सदस्या आमदार पंकजा मुंडे यांचादेखील समावेश होतो. पंकजा मुंडे यांच्यावर सामाजिक संवादाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे पंकजा मुंडे विविध ठिकाणी प्रवास करताना दिसून येत आहेत. प्रवास करताना पंकजा मुंडे यांना स्वतःच्या आरोग्याची आणि विविध गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच पंकजा मुंडे आपल्यासोबत अनेक गोष्टी कॅरी करतात. दरम्यान पंकजा मुंडेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पंकजा मुंडे आपल्या पर्समध्ये नेमकं काय-काय सोबत ठेवतात याबाबत खुलासा केला आहे. पाहूया त्यांच्या पर्समध्ये कोणत्या गोष्टी असतात.
सर्वसामान्य लोक असो सेलिब्रेटी असो किंवा राजकारणी प्रत्येकाला स्वतःची काळजी घेणे गरजेचे असते. यामध्ये आपण परिधान करत असलेल्या कपड्यांपासून ते स्किन केअरपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो. सर्वसामान्य लोक ज्याप्रमाणे आपल्या बॅगेत स्वतःच्या केअरसाठी विविध गोष्टी जवळ ठेवतात, त्याचप्रमाणे सेलिब्रेटी आणि राजकारणीसुद्धा आपल्या जवळ काही वस्तू ठेवत असतात. परंतु चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपला आवडता सेलिब्रेटी किंवा आवडता नेता आपल्या जवळ कोणत्या वस्तू ठेवतो हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळेच आज आपण पंकजा मुंडे आपल्या पर्समध्ये कोण-कोणत्या वस्तू ठेवतात. हे जाणून घेणार आहोत. ही माहिती म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी फारच उत्सुकतेची असणार आहे.
पंकजा मुंडे यांचा फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये त्या प्रवास करताना आपल्या पर्समध्ये नेमकं काय काय असतं याबाबत सांगत आहेत. पंकजा मुंडे सांगतात की, राजकीय कामानिमित्त त्यांना सतत प्रवास करावा लागतो त्यामुळे त्यांना बॅगेत विविध वस्तू बाळगाव्या लागतात. सर्वप्रथम त्यांच्या बॅगेत त्यांची छोटी पर्स असते. यामध्ये त्या पैसे ठेवत असतात. त्याशिवाय त्यांच्याकडे आणखी एक छोटंसं व्हॉयलेट आहे. यामध्ये त्या आपले महत्वाचे कार्ड्स जसे की, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड या गोष्टी ठेवतात. विशेष म्हणजे हा व्हॉयलेट त्यांना त्यांच्या मुलाने गिफ्ट केला आहे. त्यामुळे तो त्यांच्यासाठी फारच खास आहे.
याशिवाय पंकजा यांच्याकडे आणखी एक छोटा पाऊच असतो ज्यामध्ये त्या फेस क्रीम, लिपस्टिक, काजळ पेन्सिल, टूथब्रश-टूथपेस्ट आणि सेफ्टी पिनादेखील असतात. तसेच प्रवासादरम्यान चेहरा रुक्ष होतो त्यामुळे त्यांच्या बॅगेत मॉइश्चराइझर आवर्जून असत. शिवाय उन्हापासून चेहऱ्याचा बचाव करण्यासाठी सनस्क्रीनसुद्धा असते. यासोबतच नेलं पॉलिश रिमूव्हर, मिंट, च्युईंगम, कंगवा, अशा विविध गोष्टी असतात.
पंकजा मुंडे यांच्या पर्समध्ये दररोजच्या आवश्यकतेच्या सर्व गोष्टी तर असतातच, शिवाय त्यांच्या पर्समध्ये हनुमान चालीसा आणि जपमाळदेखील असते. प्रवासारम्यान त्या कधी-कधी जप करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.